Cranes clearing mangled vehicles after a deadly five-car collision near Rishabhdev on the Udaipur-Ahmedabad Highway.
Cranes clearing mangled vehicles after a deadly five-car collision near Rishabhdev on the Udaipur-Ahmedabad Highway.Saam Tv

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

Udaipur Buffalo Accident: उदयपुर-अहमदाबाद महामार्गावर म्हैस वाचवण्याच्या प्रयत्नात पाच वाहनांची एकमेकांवर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
Published on

उदयपुर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला. ऋषभदेव गावाजवळील मयूर मिलच्या समोर रात्री सुमारे आठच्या सुमारास पाच वाहनांची एकमेकांवर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयानक होता की वाहनांचे तुकडे आणि मृतदेहांचे चिथडे रस्त्यावर पडले.

Cranes clearing mangled vehicles after a deadly five-car collision near Rishabhdev on the Udaipur-Ahmedabad Highway.
School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावर अचानक एक म्हैस आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एका कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ती कार डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या वाहनांना जाऊन धडकली. काही क्षणांतच मागून येणाऱ्या गाड्याही एकमेकांवर आदळल्या आणि मोठा अपघात घडला. यानंतर रस्त्यावर काचांचे आणि लोखंडाचे तुकडे सर्वत्र पसरले होते.

Cranes clearing mangled vehicles after a deadly five-car collision near Rishabhdev on the Udaipur-Ahmedabad Highway.
Crime News: कमी वयाच्या मुलाला घरात बोलवून ठेवायची शारीरिक संबंध; नंबर ब्लॉक करताच दिली सुपारी, माजी महामंडलेश्वरचं भयानक कृत्य

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. ऋषभदेव पोलिस ठाण्याचे अधिकारी भरतसिंह राजपुरोहित आणि उपविभागीय अधिकारी भागचंद रेगर हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने ऋषभदेव रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर अवस्थेत काहींना उदयपुर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

Cranes clearing mangled vehicles after a deadly five-car collision near Rishabhdev on the Udaipur-Ahmedabad Highway.
Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

अपघातात मृत झालेले चौघेही उदयपुर जिल्ह्यातील सलुंबर तालुक्यातील सेमारी परिसरातील एका गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. हे सर्वजण उदयपुरमध्ये नातेवाईकांना भेटून बोलेरो गाडीतून परतत होते. मात्र ऋषभदेवजवळ पोहोचताच अचानक घडलेल्या अपघाताने त्यांचे आयुष्य संपवले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा झाला. काही लोक गाड्यांमध्ये अडकले होते, त्यांना गॅस कटरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितले की, रस्त्यावर सर्वत्र रक्त सांडले होते आणि काही मृतदेहांचे अवयव सैरवैर पडले होते.

अपघाताची गंभीरता पाहता पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवली आणि महामार्ग रिकामा करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने वाहनं बाजूला केली गेली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे.

पोलीस ठाण्याचे भरतसिंह राजपुरोहित यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की महामार्गावर अचानक म्हैस आल्याने एक वाहन तिला वाचवताना डिव्हायडर ओलांडले आणि समोरून येणाऱ्या वाहनांवर आदळले. या अपघाताचा तपास सुरू आहे. जखमी झालेल्या अजमेरच्या किशनगढ येथील कैलाश गणपतलाल यांनी सांगितले, सगळं काही काही सेकंदांतच घडलं. अंधारात अचानक म्हैस दिसली, ड्रायव्हरने वाचवण्याचा प्रयत्न केला पण गाडी घसरली आणि जोरदार धडक झाली. डोळ्यांसमोर सगळं संपलं. त्यांना आधी ऋषभदेव रुग्णालयात नेण्यात आलं, त्यानंतर गंभीर अवस्थेमुळे उदयपुरला हलवण्यात आलं.

अपघाताची माहिती मिळताच उदयपुर प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. मृतदेहांना ऋषभदेव रुग्णालयात ठेवण्यात आले असून रविवारी सकाळी नातेवाईक आल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कारासाठी हस्तांतर केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com