Lion Fight : सिंहिणीसाठी दोन सिंहामध्ये जबरदस्त लढाई; VIDEO पाहून थरकाप उडेल

सोशल मीडियावर दोन सिंहाच्या भांडणाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Lion Fight Viral Video
Lion Fight Viral VideoSaam Tv
Published On: 

Lion Fight Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडिओ हे मजेशीर असतात. तर काही भयंकर असतात. इंटरनेटवर प्राण्यांचे असे अनेक व्हिडिओ आहेत. जे पाहून अंगावर काटा येतो. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. कळपात राहत असल्याने सिंह कधी एकमेकांवर हल्ला करत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर दोन सिंहाच्या भांडणाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पसंती दिली आहे. (Lion Attack Viral Video)

Lion Fight Viral Video
Viral Video : 'छम्मा छम्मा' गाण्यावर एअर हॉस्टेसचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ

व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडिओत दोन सिंह हे एका सिंहिणीसाठी एकमेकांसोबत भांडताना दिसत आहे. व्हिडिओ जर तुम्ही बारकाईने बघितला तर यामध्ये एक सिंहिण दिसत आहे. याच सिंहिणीसाठी हे दोघे भांडत असल्याचं दिसत आहे. तसे पाहाता सोशल मीडियावर आपल्याला अनेक वाईल्ड लाईफ व्हिडीओ पाहायला मिळतात.

मात्र दोन सिंहांमधील भांडणाचा हा व्हिडिओ सर्वांनाच थक्क करणारा आहे. सिंहिणीसाठी लढणारे हे दोन्ही सिंह खूपच शक्तीशाली दिसत आहे. दोघेही एकमेकांवर हल्ला करताना दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा हे दोन सिंह एकमेकांवर झपाटत असतात, तेव्हा सिंहिण सुद्धा दोघांमध्ये मध्यस्थी करताना दिसून येत आहेत. (Two Lion Fight Viral Video)

भांडण करणारे दोन्ही सिंह इतके शक्तीशाली आहेत की, यांच्या लढाईचा शेवट कसा होईल? आणि यामध्ये नक्की कोण जिंकेल अशीच उत्सुक्ता लोकांना लागली आहे. जवळपास ६० सेकंदाच्या या व्हिडिओत दोन्ही सिंह अक्षरश: एकमेकांवर तुटून पडलेत. मात्र, तरी देखील याचा कोणताही निकाल लागला नाही. परंतु सिंहीणीच्या या वागण्यावरुन तरी असंत दिसत आहे की, तिनं ठरवलं आहे की, तिला आता कोणत्या सिंहाकडे जायचं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.