Viral Video : 'छम्मा छम्मा' गाण्यावर एअर हॉस्टेसचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ

मीनाक्षी असं या एअर हॉस्टेसचं नाव आहे
Uma Meenakshi Viral Video
Uma Meenakshi Viral VideoSaam TV

Uma Meenakshi Viral Video : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका एअर होस्टेसनं चांगलाच धुमाकूळ घातलाय. या एअर हॉस्टेसनं केलेल्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. छम्मा-छम्मा गाण्यावर तिनं चांगलाच ठेका धरला. मीनाक्षी असं या एअर हॉस्टेसचं नाव आहे. मीनाक्षीने केलेल्या या भन्नाट डान्सला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

Uma Meenakshi Viral Video
म्हशीसमोर नाचणं तरुणीला पडलं महागात; नक्की काय घडलं? पाहा VIDEO

मीनाक्षीं नेहमी डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा विमानात डान्स करतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या व्हिडिओला (Viral Video) नेटकरी नेहमी प्रतिसाद देतात.

आता मीनाक्षीने चायना गेट या चित्रपटातील छम्मा-छम्मा या गाण्यावर ठेका धरला. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मीनाक्षी ही निसर्गरम्य ठिकाणी असून तिने काळ्या कलरचा टी शर्ट परिधान केला आहे. तिचा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, एखादी प्रोफेशनल डांसर डान्स करत आहे. (Girls Dance Viral Video)

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला असून, एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘खूप सुंदर डान्स केला, मी वेडा झालो.’ तसेच आणखी एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘तू खूप छान डान्स केला आहे, तुझे व्हिडिओ नेहमी छान असतात' या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com