सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त IAS तुकाराम मुंडे यांची राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे बेपरवाना खाद्यपदार्थ विक्रेते आणि अस्वच्छ पद्धतीने खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात देखील अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांवरील नियम कडक केले आहेत. कर्नाटक अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यपदार्थांच्या तक्रारीसाठी नागरिकांना QR Code ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे नागरिकांची तक्रार सहज आणि थेट आधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. हा उपक्रम सेंटर फॉर ई गव्हर्नन्सच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आणि ग्राहकही QR Code स्कॅन करून अन्न व औषध संबंधित तक्रारी सहज नोंदवू शकतात.
औषधांचे होणारे साईड इफेक्ट्स
एखादे मेडिकल औषधांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत आकारत असेल तर तक्रार नोंदवू शकता.
मेडिकल मुदत संपलेले औषध विकत असेल तर त्याची तक्रार तुम्ही नोंदवू शकता.
इतर फार्मसी सेवांशी संबंधित तक्रारी
ज्या ठिकाणी तुम्ही खाताय त्या ठिकाणी काही स्वच्छता नसेल, हायजीनचे नियम पाळत नसतील. डास, झुरळ, उंदीर यांचा प्रादुर्भाव असेल अशा ठिकाणाची तक्रार तुम्ही तक्रार करू शकता.
एखाद्या पदार्थात भेसळ असल्याची शंका आल्यास तक्रार नोंदवू शकता.
रस्त्यावर, फुटपाथवर अवैधरित्या, विनापरवाना अन्नपदार्थ विकणे सुरू असेल तर याची तक्रार तुम्हाला नोंदवता येईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्यू आर कोडमुळे पारदर्शकता वाढणार आहे. नागरिकांना होणारा त्रास, तक्रार या क्यू आर कोड प्रणालीव्दारे थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. यामुळे तक्रारींवर किंवा संबंधित ठिकाणांवर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे. याचसोबत डि फार्माच्या विद्यार्थ्यांसाठी ई -मार्क्स तर डी फार्मसी धारकांसाठी ई - सर्टिफिकेट सारख्या डिजीटल व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. ही सुविधा हॉटेल्स, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि शासकीय, खाजगी संस्था येथे उपलब्ध असेल.
अन्न सुरक्षा किंवा भेसळीसंबंधित तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही फूड सेफ्टी कनेक्ट या राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलला भेट देऊ शकता. FSSAI शी संबंधित टोल फ्री क्रमांक १८००११२१०० किंवा व्हॉट्सअप नंबर ९८६८६८६८६८ यावर संपर्क साधू शकता.