ट्रम्प-मुनीर 'शाही' मेजवानी, इराणविरोधात पाकचा वापर; मुनीरला अमेरिकेत शाही मेजवानी

Trump-Munir Yoyal Banquet : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी थेट ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधून शाही मेजवानीचा आस्वाद घेतलाय. मात्र ट्रम्प यांची मुनीरला शाही मेजवानी नेमकी कशासाठी होती? इस्त्रायल-इराण युद्धात ट्रम्प नेमका कोणता डाव आखतायत?
Trump-Munir Yoyal Banquet
Trump-Munir Yoyal BanquetSaam Tv news
Published On

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये पायघड्या घालण्यात आल्यात. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी डिनरचं आयोजन केलं होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये पाक लष्करप्रमुखांसाठी डिनर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी मुनीर यांच्या सोबत पाकचा कुठलाही अधिकारी नव्हता. मुनीर यांच्या भेटीवेळी डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले पहा.

ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

माझ्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले. माझे पाकिस्तानवर प्रेम आहे. मला वाटते की, मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत. मी रात्रीच त्यांच्याशी बोललो. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत व्यापार करार करणार आहोत. मी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्ध थांबवले. या व्यक्तीने (असीम मुनीरने) पाकिस्तानच्या बाजूने आणि पंतप्रधान मोदींनी भारताच्या बाजूने ते थांबवण्यात खूप प्रभावी भूमिका बजावली. दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत, त्यांना थांबवावे लागेल.

Trump-Munir Yoyal Banquet
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजूरी, नोकरदारांच्या पगारात किती होणार वाढ?

दरम्यान, अमेरिकेनं मुनीर यांना शाही मेजवानी देण्यामागे अमेरिकेने मोठी योजना आखलीय. अमेरिकेच्या या खेळीमागे खरं कारण आहे इराण-इस्रायल युद्ध. अमेरिकेला इराणवर हल्ला करायचा असल्यास त्यांच्या मुसक्या आवळणं पाकमधूनच सोपं जाणारेय. त्यामुळे अमेरिकेची डिनर डिप्लोमसी काय आहे. पाहूयात.

असीम मुनीरला शाही जेवण का?

पाकिस्तान आणि इराणची सीमा एकच आहे

इराणविरोधात कारवाईसाठी पाकिस्तानचा भू भाग, हवाई क्षेत्र वापरता येईल

थेट हल्ला टाळायचा असेल तर पाकमधून सायबर हल्ला, ड्रोन ऑपरेशन्स असा अप्रत्यक्ष हल्लाचा पर्याय

पाकमधील सुन्नी कट्टर गटाचा वापर करुन इराणमध्ये अस्थिरता निर्माण करता येऊ शकते

आर्थिक किंवा लष्करी मदतीच्या बदल्यात पाक दबावाखाली सहकार्य करण्याची शक्यता

Trump-Munir Yoyal Banquet
धक्कादायक! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सोनम लेस्बियन? राजाच्या भावाने सांगितली आतली गोष्ट

इस्रायल आणि इराणमधील युद्ध शिगेला पोहोचल्यानंतर पाकिस्तानानं जाहीरपणे इराणला पाठिंबा दिला होता. मात्र पाकिस्तानचा हा मुस्लिम राष्ट्रासोबतचा भाईचारा ट्रम्प भेटीनंतर त्यांचा दुटप्पीपणा उघड करतोय. त्यामुळे मुनीर अमेरिकेच्या जाळ्यात अडकून शेजारील मुस्लिम राष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसत आहे का? असा सवालही उपस्थित केला जातोय.

मुळात अमेरिकेसारखा देश कधीच कोणाला कुठल्या कारणाशिवाय जवळ करत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी असीम मुनीरला शाही मेजवानीसाठी बोलावले म्हणजे यामागे मोठी रणनिती आहे हे निश्चित. अमेरिका अजून इस्रायल-इराण युद्धात उतरलेली नाही. पण भविष्यात अमेरिका युद्धात सहभागी झाली, तर त्यांना इराणच्या जवळील एअरबेसेसची गरज पडू शकते. अफगाणिस्तान युद्धाच्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानचे एअरबेस आणि इंटेलिजन्सचा वापर केला होता. इराणमधील पाकिस्तानच्या इंटेलिजन्स नेटवर्कचा अमेरिकेला वापर करायचा आहे. मुनीर यांच्या शाही मेजवानीच्या मागे अमेरीकेचे हेच डावपेच असल्याचं बोललं जात आहे.

Trump-Munir Yoyal Banquet
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेमागील कारण लवकरच समोर येणार, एअर इंडियाचे सीईओ म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com