Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेमागील कारण लवकरच समोर येणार, एअर इंडियाचे सीईओ म्हणाले...

Air India airplane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेवर एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅम्पबेल विल्सन यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crashx
Published On

१२ जून रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. हे विमान मेघानीनगर परिसरातील एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. दुर्घटनेच्या वेळेस विमानात २४२ जण होते. यातील फक्त एकमेव प्रवासी सुखरुप बचावला. २४१ जणांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. या एकूण घटनेवर एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी प्रतिक्रिया दिली.

अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरची देखभाल व्यवस्थितपणे करण्यात आली होती. जून २०२३ मध्ये विमानाची कसून तपासणी करण्यात आली होती आणि डिसेंबर २०२५ मध्ये पुढील तपासणी होणार होती. पुढील काही आठवड्यांसाठी मोठ्या विमानांच्या उड्डाणात १५ टक्के कपात केली जाणार आहे, ही फक्त तात्पुरती आहे, असे वक्तव्य एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी केले आहे.

Ahmedabad Plane Crash
Pune Crime : पानशेतला फिरायला गेले, सिगारेट ओढण्याची तल्लफ लागली, तरुणानं धूम्रपान करण्यास अडवलं अन् टोळीने...

विमान आणि इंजिन दोन्ही नियमितपणे तपासण्यात आले होते. त्यामुळे उड्डाणापूर्वी कोणताही तांत्रिक बिघाड झाल्याचे आढळले नव्हते. मार्च २०२५ मध्ये विमानाचे उजवे इंजिन दुरुस्त करण्यात आले होते, तर डावे इंजिन एप्रिल २०२५ मध्ये तपासण्यात आले होते. या बोईंग विमानाची शेवटची चाचणी जून २०२३ मध्ये झाली होती, अशी माहिती कॅम्पबेल विल्सन यांनी दिली.

Ahmedabad Plane Crash
कोल्हापूरमध्ये स्मशानभूमीत काळीजादूचा प्रकार, महिला आणि पुरुष नग्नावस्थेत करायचे करणी, भानामती; घटना सीसीटीव्हीत कैद

कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, ही दुर्घटना कशामुळे झाली हे समजून घेण्यासाठी एअर इंडिया आणि संपूर्ण विमान उद्योग अधिकृत तपास अहवालाची वाट पाहत आहेत. प्रवाशांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी कंपनी बोईंग ७८७ आणि ७७७ विमानांची सुरक्षा तपासणीत वाढ करण्यात आली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी एअर इंडिया शक्य ते सगळंकाही करत आहे.

Ahmedabad Plane Crash
Beed : माझ्या मुलांचं वाटोळं केलं...; शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला, पैशांसाठी कंपनीत गेला अन् दारातच उचललं धक्कादायक पाऊल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com