
Pune : पुणे जिल्ह्यातील पानशेत परिसरात फिरण्यासाठी काही तरुण गेले होते. सिगारेट ओढण्यावरुन एका स्थानिक नागरिकासोबत त्यांचा वाद झाला. वादाचे तुरुंगात पुढे मारहाणीत झाले. मारहाणीमध्ये स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचही आरोपी तरुणी मूळचे परभणीचे आहेत. कामानिमित्ताने ते पुण्यात राहत होते. आल्हाददायक वातावरणात फेरफटका मारण्यासाठी ते पानशेतला गेले होते. तेव्हा फिरत असताना एका स्थानिक तरुणाशी त्यांचा सिगारेट ओढण्यावरुन वाद झाला. पाचही जणांना तरुणाला बेदम मारहाण केली. छातीवर दगड फेकून मारल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव रोहिदास काळूराम काटकर (वय २४) असे आहे. आकाश भिसे (वय २१), भागवत आसुरी (वय २०), रितेश जोगदंड (वय १९), रमेश शेळके (वय २१) आणि पांडुरंग सोनावणे (वय १९) असे आरोपी तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण पानशेतमधील नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेलसमोर सिगारेट ओढत होते. तेव्हा रोहिदास काटकर यांनी धूम्रपान करु नका असे म्हटले. यावरुन वाद झाला आणि पाचही तरुणांनी एकत्र येत काटकरवर हल्ला केला. एकाने त्याच्या छातीवर मोठा दगड फेकून मारला. यामुळे रोहिदास काटकरचा जागीच मृत्यू झाला.
१५ जून रोजी ही घटना वेल्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. पण पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस स्थानकाच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत सर्व आरोपींना अटक केली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.