धक्कादायक! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सोनम लेस्बियन? राजाच्या भावाने सांगितली आतली गोष्ट

Sonam Raghuvanshi Lesbian : राजा याच्या हत्येनंतर सर्वात मोठा प्रश्न उरला होता की त्यावेळी शिलाँगमध्ये असलेली त्याची पत्नी सोनम ११६४ किमी अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशातील गाजीपूरला कशी पोहोचली?
Sonam Raghuvanshi Lesbian
Sonam Raghuvanshi LesbianSaam Tv News
Published On

इंदूर : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवीन दावे अन् खुलासे केले जात आहेत. दरम्यान, राजा रघुवंशी याची पत्नी आणि या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनमची कुंडली वाचणारे ज्योतिषी अजय दुबे यांनी एक मोठा दावा केला आहे. ज्योतिषी अजय दुबे यांचा दावा आहे की सोनमच्या कुंडलीतील संयोगानुसार ती समलैगिंक आहे. ज्योतिषी म्हणतात की या हत्येत १० लोकांचा सहभाग असू शकतो. ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार, सोनमचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

यापूर्वी मृत राजा रघुवंशीच्या भावानेही या खून प्रकरणात एका मुलीवर संशय व्यक्त केला होता. राजा रघुवंशीच्या भावाचा दावा आहे की ती मुलगी सोनमच्या सतत संपर्कात होती. ज्या मुलीवर आरोप केला जात आहे ती सोनमची मैत्रीण असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन राजाचे कुटुंब करत आहे. सध्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे, अटकळ आणि अफवा पसरत आहेत. परंतु विश्वास फक्त पोलीस तपासावर आहे. मेघालय पोलिस या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून पकडलं

राजा याच्या हत्येनंतर सर्वात मोठा प्रश्न उरला होता की त्यावेळी शिलाँगमध्ये असलेली त्याची पत्नी सोनम ११६४ किमी अंतरावर असलेल्या उत्तर प्रदेशातील गाजीपूरला कशी पोहोचली? मेघालय पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या संयुक्त तपासात असं समोर आलं आहे की, सोनमने आधीच तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला होता आणि घटनेनंतर स्वतःला वाचवण्यासाठी तिने गाझीपूरला जाण्याचा संपूर्ण मार्ग तयार केला होता. हत्येच्या दोन दिवसांनंतर, तिने गुवाहाटीहून ट्रेन पकडली आणि इंदूरला पोहोचली आणि नंतर तेथून ती उत्तर प्रदेशला रवाना झाली.

हत्येनंतर सोनम इंदूरला पोहोचली आणि तिच्या प्रियकराला भेटली

२३ मे रोजी सोहरा (चेरापुंजी) येथे राजाची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येनंतर लगेचच सोनमने राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवर "सात जन्मों का साथ" अशी भावनिक पोस्ट पोस्ट केली जेणेकरून कोणताही संशय येऊ नये. यानंतर, ती २३ मे रोजीच गुवाहाटी पोहोचली आणि ट्रेनने इंदूरला रवाना झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com