अमेरिकेचा इराणला अल्टिमेटम, शस्त्रे खाली टाका, अन्यथा मृत्यू अटळ

Trump Iran Warning: इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यांना पुरून उरणारा इराण काही ऐकायला तयारी नाहीये. अशात आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय.
US President Donald Trump issues a strong warning to Iran as the United States deploys B-52 bombers amid rising Middle East tensions
US President Donald Trump issues a strong warning to Iran as the United States deploys B-52 bombers amid rising Middle East tensionsSaam Tv
Published On

इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराण मागे हटण्यास तयार नाहीये. खामेनींच्या खात्म्यानंतर चवताळलेला इराण इस्त्रायल-अमेरिकेच्या धमक्यांना भीक घालत नाहीये. अशातच आता अमेरिकेनं थेट इराणचं 'डेथ वॉरंट' काढलंय... शस्त्र खाली टाका नाहीतर मृत्युला सामोर जा अशी धमकीच आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय. त्यादृष्टीनेच अमेरिकेने पुन्हा एकदा बी-५२ बॉम्बर्स आणि स्टेल्थ फायटर्स इराणवर हल्ल्यासाठी तैनात केली आहेत.

आधीच इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी अमेरिकेनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केलाय. एव्हढंच नाही तर आमची अट मान्य न केल्यास मोठी कारवाईला सामोरं जाण्यास सज्ज राहा, असा इशाराही इराणला दिला गेलाय. आता खामेनींच्या मुत्युनंतर तेवढ्याच आक्रमकपणे लढणाऱा इराण आता ट्रम्पच्या या अल्टीमेटमनंतर शस्त्र खाली टाकणार की तेवढ्याच त्वेषानं हल्ले करत राहणार याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com