Crime : आजोबा म्हणायची त्याने इज्जत लुटली, चिमुकलीवर बलात्कार करून विष पाजलं

Girl raped in Agartala : त्रिपुरातील आगरतळ्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विष पाजल्याचं संतापजनक प्रकरण समोर आलेय. मुलीची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.
Girl raped in Agartala
Police arrest accused in Agartala for assaulting and poisoning a minor girl; POCSO case registered.Saam TV Marathi Nes
Published On

Girl raped, poisoned in Agartala : ज्याला आजोबा बोलायची, त्याच नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपीने बलात्कारानंतरही अल्पवयीन मुलीला सोडलं नाही. त्याने तिला जिवे मारण्याच्या इराद्याने विष प्यायला दिले होते. त्रिपुरामध्ये ही भयानक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीची प्रकृती संध्या नाजूक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीच्या जबाबानंतरच पुढील कारवाईला वेग येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

ओळखीच्याच एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीसोबत क्रूर बलात्कार केला तिला विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली. आगरतळा येथील राजनगर परिसरात हादरवणारी घटना घडली. आरोपीचे नाव शंकर दास असे असून त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शंकर दास हा मासे विक्रीचा व्यावसाय करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतेय.

Girl raped in Agartala
Maharashtra Live News Update : वीज कर्मचाऱ्यांचा ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे पालक उपचारांसाठी गावाबाहेर गेले होते. त्यावेळी ओळखीचा फायदा घेत शंकर दास याने डाव साधला. आरोपीने मुलीला आमिष दाखवत रिकाम्या खोलीत नेलं अन् बलात्कार केला. त्यानंतर विष पिण्यासही भाग पाडल्याचे प्रथामिक तपासून समोर आले आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असल्याचेही सांगण्यात आलेय. धक्कादायक म्हणजे, मुलगी आरोपीला प्रेमाने आजोबा म्हणत होते. त्यानेच तिचा बलात्कार केला अन् विषारी किटकनाशक पिण्यास भाग पाडले.

Girl raped in Agartala
IND vs PAK : भारतीय महिला संघाची अभिमानास्पद कामगिरी, पाकिस्तानला ८८ धावांनी लोळवलं, वर्ल्डकपमध्ये बाराव्यांदा धोबीपछाड

मुलीसोबत क्रूरता केल्यानंतर शंकर दासने घटनास्थळावर पळ काढला. स्थानिकांना मुलगी अत्यावस्थेत आढळली. त्यांनी तात्काळ तिला आधी रूग्णालयात दाखल केला. या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांकडून या प्रकणाचा गंभीर तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अल्पवयीन मुलीला अनेक जखमा झाल्या आहेत आणि तो अजूनही वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

Girl raped in Agartala
Hospital Fire: रूग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव, ICU मधील ६ रूग्णांचा गुदमरून मृत्यू

या घटनेनंतर आरोपी शंकर दास याच्या मुसक्या तात्काळ आवळण्यात आल्या. रविवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. पीडिता सध्या रुग्णालयात दाखल असून तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि हत्येच्या प्रयत्नाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girl raped in Agartala
Maharashtra politics : नालायक वृत्तीला विरोधच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा पुन्हा हल्लाबोल, नवी मुंबईतला वाद पेटला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com