

गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघात झाला
वलसाड जिल्ह्यातील कुंभघाटाजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक
या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला
एक व्यक्ती गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू
गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघात झाला असून यामध्ये ७ जणांचा दु्र्दैवी मृत्यू झाला. वलसाड जिल्ह्यातील कपराडा परिसरातील कुंभघाटाजवळ पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. भरधाव कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरात पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण अंबा वन परिसरात राहणारे होते. मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्वजण कारमधून कापराडाहून नानापोडा येथे जात होते. त्याचवेळी कुंभघाटा येथे त्यांच्या कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही.
या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये कुंभघाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.