
आग्रामध्ये दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण नदीत बुडाले.
या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आलं.
बेपत्ता झालेल्या इतर तरुणांचा शोध सुरू आहे.
आगरामध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये बुडाले. यामधील दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे घटनास्थळावर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. तर बेपत्ता झालेल्या इतर तरुणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली असून ते बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील खेरागड भागातील एक कुटुंब गुरुवारी विजयादशमीनिमित्त दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी उंटगन नदीत गेले होते. कुटुंबातील काही तरुण मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले. अचानक त्यांचा तोल गेला आणि ६ तरुण नदीत बुडाले. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. एका तरुणाला वाचवण्यात यश आले. तर इतर जणांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेपूर्वी उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे देखील अशीच घटना घडली. दुर्गा मातेच्या विसर्जनादरम्यान एका मुलाचा पाय घसरला आणि तो बेसो नदीमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा छोटा भाऊ, काका आणि गावातील एका व्यक्तीने नदीमध्ये उडी मारली. हे सर्वजण नदीमध्ये बुडाले. नदीत बुडालेल्या या सर्वांना गावकऱ्यांनी वाचवले आणि सुरक्षित नदीतून बाहेर काढले. पण नदीत बुडून सीकू नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. एका तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तर उज्जैनमध्ये दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर नदीत कोसळला. या घटनेमध्ये ८ जण चंबल नदीत बुडाले यामधील ५ जणांना वाचवण्यात यश आले. तिघांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका १२ वर्षांच्या मुलाने ट्रॅक्टरची चावी फिरवली. ट्रॅक्टर चालू झाला आणि तो नदीच्या दिशेने पुढे सरकू लागला आणि बघता बघता तो नदीत कोसळला. त्यानंतर घटनास्थळी किंचाळ्या, आरडाओरडा आणि रडारडी सुरू झाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने ५ जणांचा सुरक्षित बाहेर काढले. तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह अद्याप सापडले नाही. त्यांचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.