Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv
Published On: 

Petrol Diesel Price Today - जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल सुमारे १ डॉलरने वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किरकोळ किमतींवर दिसून आला. आज, यूपीच्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत, तर बिहारमध्ये त्याचे दर कमी होत आहेत.

Petrol Diesel Prices
Nawab Malik : देशमुखांपाठोपाठ नवाब मलिकांनाही जामीन मिळणार? मुंबई हायकोर्टात आज तातडीने सुनावणी

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 16 पैश्यांनी महागले असून 96.76 रुपये प्रति लिटर झाले आहे तर डिझेल 89.93 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. लखनऊमध्ये पेट्रोल 6 पैशांनी महागले असून 96.48 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल 5 पैशांनी वाढून 89.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी वाढून 96.58 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 30 पैशांनी वाढून 89.73 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोलची किंमत 18 पैशांनी घसरून 107.24 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 17 पैशांनी घसरून 94.04 रुपये प्रति लीटर झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
VIDEO : गिऱ्हाईक बनून आला अन् मोबाईल चोरून नेला; चोरट्याचा कारनामा CCTVत कैद

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.