Nawab Malik
Nawab MalikSaam TV

Nawab Malik : देशमुखांपाठोपाठ नवाब मलिकांनाही जामीन मिळणार? मुंबई हायकोर्टात आज तातडीने सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
Published on

Nawab Malik Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने मलिक यांचा जामीन फेटाळला होता. या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आज जामीन मिळणार की त्यांना तुरूंगातच राहावे लागणार याकडेच सर्वाचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)

Nawab Malik
Pune : पुण्यातील काँग्रेस भवनात पक्षाच्या भरभराटीसाठी होम-हवन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मलिक (Nawab Malik) यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत फेब्रुवारीत त्यांना अटक केली होती.

विशेष न्यायालयात मलिक यांनी वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्याने मलिक यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court)  जामीनासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर उद्या, आज म्हणजेच मंगळवारी सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी जामीन मिळाला. कथित १०० कोटी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई हायकोर्टाने देशमुखांचा जामीन मंजूर केला. मात्र, पुढच्याच क्षणी कोर्टाने त्यांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती सुद्धा देण्यात आली.

Nawab Malik
VIDEO : गिऱ्हाईक बनून आला अन् मोबाईल चोरून नेला; चोरट्याचा कारनामा CCTVत कैद

कारण, सीबीआयने या जामीनाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हायकोर्टाला सांगितलं. यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली. सीबीआयच्या विनंती मान देऊन न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक यांनी सुद्धा जामीनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावर आज तातडीने सुनावणी होणार असून देशमुखांपाठपाठ नवाब मलिक यांनाही जामीन मिळतो का ? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com