Tirupati: तिरुपती बालाजीच्या मंदिरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू; रांगेत नेमकं काय घडलं?

Tirupati Mandir: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मंदिर प्रशासनाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Tirupati
TirupatiSaam Tv
Published On

सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या तिरुपती मंदिरात दुर्दैवी प्रकार घडला आहे. तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, मात्र तिरुपती मंदिरात नेमका काय घडलं.कशी घडली ही दुर्घटना जाणून घेऊ...

Tirupati
Tirupati Temple Stampede : प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

तिरुपतीत चेंगराचेंगरी,6 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन समितीकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्यात. मात्र, तरीही बुधवारी रात्री तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. देवदर्शनासाठी आलेल्या 5000 भाविकांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून किमान 30 जखमी झालेत.

Tirupati
Air Strike: म्यानमार लष्कराकडून आपल्याच देशातील गावावर एअर स्ट्राइक; हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू, काय आहे कारण?

नेमकं घडलं काय?

तिरूपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. याच पार्श्वभुमीवर देवस्थानकडून भाविकांना दर्शनासाठीचे टोकन वितरीत करण्यात येत होते.सकाळपासूनच या काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत गर्दीचा आकडा 5 हजारांवर पोहोचला. त्यानंतर दर्शन पास घेण्यासाठी धक्काबुक्की झाली त्यातून ही दुर्घटना घडली. मात्र तिरुपती सारख्या श्रीमंत संस्थानकडून भाविकांचं योग्य नियोजन होत नसेल तर नवलच...भविष्यात श्रीमंत देवस्थानात अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

Tirupati
Assam News : Google maps चा वापर अन् पोलिसांना खावा लागला मार, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com