Tirupati Temple Stampede : प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Tirupati Tragedy News : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडल आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Tirupati Temple Stampede :
Tirupati Temple Stampede Ani
Published On

तिरुपती : प्रसिद्ध तिरुपती मंदिराच्या विष्णू निवासाजवळ चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. या चेंगराचंगरीच्या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिरुपती मंदिराच्या रामानायुडू शाळेजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत मल्लिगा (५०) यांच्यासहित एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश व्यक्त केला.

Tirupati Temple Stampede :
Ajith Car Accident Video: अजित कुमारचा अपघात; १८०चा स्पीड, रेस ट्रकवर ६ वेळा गरागरा फिरली कार, गाडीचा झाला चक्काचूर

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुमला स्थित भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात बुधवारी रात्री चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तिरुमला तिरपती देवस्थानमच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. वैकुंठ द्वार येथे दर्शनासाठी शेकडो लोकांनी तिकीट मिळवण्यासाठी गर्दी केली, त्यावेळीच ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या मंदिरात देशभरातून शेकडो भाविक हजेरी लावतात. यासाठीच शेकडो भाविक १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या १० दिवसांच्या वैकुंठ द्वार दर्शनासाठी आले होते.

Tirupati Temple Stampede :
Accident News: १० जणांना घेऊन जाणारी जीप १५० फूट खोल दरीत कोसळली, कसाऱ्यात भीषण अपघात

आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी घटनास्थळावरील परिस्थिती हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारपूस केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू यांनी उच्च अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचा आदेश दिला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू यांनी दु:ख व्यक्त केले.

Tirupati Temple Stampede :
Shocking News in Mumbai : घरात अख्खं कुटुंब झोपलं होतं, मध्यरात्री मुलीनं ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं आयुष्य

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी घटनास्थळावरील परिस्थिती हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारपूस केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू यांनी उच्च अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचा आदेश दिला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू यांनी दु:ख व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com