Ajith Car Accident Video: अजित कुमारचा अपघात; १८०चा स्पीड, रेस ट्रकवर ६ वेळा गरागरा फिरली कार, गाडीचा झाला चक्काचूर

Actor Ajith Kumar Accident News: दक्षिण सुपरस्टार अजीत कुमार यांच्या रेसर कारचा अपघात झालाय. दुबईमध्ये रेसिंगची प्रॅक्टिस करत होते. त्यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला.
Ajith Car Accident
Actor Ajith Kumar Accident NewsSaam Tv
Published On

रेसिंगचा सराव करताना साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा अपघात झालाय. एका कार रेसिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तो दुबईला गेला होता. अभिनेता अजित कुमार सराव करता होता. सहा तासांचा सराव करण्याची परवानगी त्याला मिळाली होती. त्यावेळी त्याच्या रेसिंग कारला अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी त्याच्या कारचा स्पीड १८० किमी होता.

१८० किमीच्या स्पीडमधील कार बॅरियरला धडकते त्यानंतर ही कार रेस ट्रकवर ६ वेळा गरागरा फिरली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साऊथचा सुपरस्टार थोडक्यात बचावला

अजित कुमारला रेसिंगची प्रॉक्टिस करण्याची परवानगी मिळाली होती. तो 6 तास सराव करणार होता. चाचणी सुरू असताना थोडाच वेळ शिल्लक होता जेव्हा त्याची रेसिंग कार नियंत्रणाबाहेर जाते आणि अडथळ्याला आदळल्यानंतर ती फिरताना दिसते. अपघाताच्या वेळी कारचा वेग १८० किमी होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून सर्वजण अभिनेत्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत.

सुपरस्टार अजित कुमार रेसिंगचा शौकीन आहे. त्याची स्वता: ची रेसिंग कंपनी आहे. अजित कुमार या कार रेसिंग स्पर्धेत त्याच्या सहकाऱ्यांसह मॅथ्यू डेट्री, फॅबियन ड्यूफ्यूक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओडसह सहभागी होणार होता. गेल्या वर्षीही तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. अपघातानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो धोक्याबाहेर आहे. या घटनेबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com