राजधानी एक्सप्रेसच्या बी1 डब्याला भीषण आग लागली
१५ मिनिटांत ६८ प्रवाशांची सुरक्षित सुटका
कोणतीही जीवितहानी नाही; मोठी दुर्घटना टळली
दिल्ली-मुंबई मार्गावर वाहतूक काही काळ ठप्प
Thiruvananthapuram-Nizamuddin Rajdhani Express Fire तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (१२४३१) च्या बी१ एसी डब्याला भीषण आग लागली असल्याची बातमी समोर आली आहे. रविवारी सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास कोटा रेल्वे विभागांतर्गत रतलाम जिल्ह्यातील अलोट स्टेशनजवळ, लुनी रिछा आणि विक्रमगड अलोट स्टेशनच्या दरम्यान घडली. या घटनेदरम्यान ट्रेनमधून एकूण ६८ प्रवासी प्रवास करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून ट्रेनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस वेगात धावत असताना एक्सप्रेसच्या बी१ डब्यातून अचानक धूर निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती इंजिन चालकाला दिली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन गाडी तातडीने थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफच्या जवानांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले.
आपत्कालीन परिस्थितीत अवघ्या १५ मिनिटांत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. डब्यात एकूण ६८ प्रवासी होते. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागलेला डबा तातडीने गाडीपासून वेगळा करण्यात आला. तसेच, आणखी कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून ट्रेनचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कोटा रेल्वे विभागातील बचाव पथके, अग्निशमन दल आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे दिल्ली-मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या दोन तासांपासून अनेक गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.