थायलंडच्या तरूणीला 60 लाखांचा गंडा, अविवाहित असल्याचं सांगून तरूणीशी विवाह

Love, Marriage and Rs 60 Lakh Fraud: थायलंडची एक तरूणी कानपूरमधल्या मोहम्मद इरफानच्या प्रेमात पडली. प्रेमाखातर तिनं लग्न केलं आणि ती भारतात आली. पण इथे भलतचं घडलं. मोहम्मद आधीच तीन मुलांचा बाप होतात. त्यात त्याने थायलंडच्या तरूणीकडून 60 लाख रूपये उकळल्याचाही आरोप होतोय. काय आहे हा सगळा प्रकार, चला पाहूयात...
THAI WOMAN ALLEGES RS 60 LAKH FRAUD IN KANPUR, MAN ARRESTED
THAI WOMAN ALLEGES RS 60 LAKH FRAUD IN KANPUR, MAN ARRESTEDsaam tv
Published On: 

दृश्यात दिसणारी हीच ती तरूणी, जिची भारतातल्या एका तरूणानं फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यावरून कानपूरमधील वातावरण तापलंय. थायलंडमधील महिलेच्या तक्रारीवरून कानपूर पोलिसांनी मोहम्मद इरफान नावाच्या व्यक्तीला अटक केलीय. अविवाहित असल्याचं सांगून इरफानने लग्न केलं आणि वेगवेगळ्या कारणांसाठी जवळपास ६० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय इरफानच्या घरी तिच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोपही तिनं आपल्या तक्रारीत केलाय. नेमकं काय आहे प्रकरण चला पाहूयात

चार वर्षांपूर्वी थायलंडमधील एका महिलेची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कानपूरच्या इरफानशी ओळख झाली. कामासाठी इरफानचं थायलंडमध्ये सातत्यानं येणं-जाणं असायचं. या भेटीगाठींमधून दोघांमधील जवळीक वाढली. दोन वर्षांपूर्वी दोघांनी थायलंडमध्ये लग्न केलं. लग्नानंतरही इरफान थायलंडला जात-येत राहिला. याच काळात त्याने विविध व्यावसायिक गरजांचं कारण सांगून तिच्याकडून पैसे घेतले. अशा प्रकारे तिने एकूण ६० लाख रुपये त्याला दिले. जेव्हा महिलेनं आपले पैसे परत मागितले, तेव्हा इरफानने तिला भारतात येऊन सोबत राहण्यास सांगितलं आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट घातली. तसेच तिला बुरखा घालण्यासही सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला.

तिने नकार दिल्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये इरफान भारतात परतला आणि तिच्याशी संपर्क तोडला. त्यामुळे 6 ऑक्टोबर रोजी ही महिला एका ओळखीच्या व्यक्तीसह इरफानच्या घरी पोहोचली. तिथे पोहोचल्यावर तिला इरफानचं आधीच लग्न झालं असून त्याला तीन मुलं असल्याचं समजलं. त्यानंतर तिने इरफान विरोधात कानपूर पोलिसांत तक्रार दिली.

या महिलेनं पोलिसांकडे इरफानसोबतच्या लग्नाचे सर्व पुरावे आणि कागदपत्रं सादर केली आहेत. ती थायलंडमध्ये कॅन्टीन आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय करते. इरफानला पैसे देण्यासाठी तिनं तिच्या स्वतःच्या कमाईसोबतच नातेवाईकांकडून उधार घेतलेले होते.

त्यामुळे तिनं संपूर्ण रकमेची मागणी केलीय. आता तिच्या तक्रारीच्या आधारे अन्वरगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी मोहम्मद इरफानला अटक केलीय. पोलीस लग्नाची कागदपत्रं, दोघांमधील आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com