Breaking : दहशतवादी जुनैद मोहम्मदच्या चौकशीत उघड झाली 'ही' धक्कादायक माहिती

दहशतवादी जुनैद मोहम्मदने जम्मू-काश्मीरमध्ये काही जणांना दहशतवादी संघटनेत सहभागी केलं होतं.
Terrorist
Terrorist Saam Tv
Published On

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून 'लष्कर ए तोयबा' अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका संशयित तरुणाला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. जुनैद मोहम्मद (Junaid Mohammed) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतिरेकी (Terrorist) संघटनांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपाखाली जुनैदवर कारवाई केलीय. दापोडी परिसरातून जुनैदला अटक केल्यानंतर न्यायालयात आज हजर करण्याल आले होते. त्यानंतर जुनैदला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. दरम्यान, जुनैद मोहम्मद याने (Maharashtra) महाराष्ट्र, झारखंड,उत्तराखंड,उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित केल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आलं आहे. तसंच जुनैदने जम्मू-काश्मीरमध्ये काही जणांना दहशतवादी संघटनेत सहभागी केलं होतं. त्यानंतर ही मुलं लष्करी कारवाईत मारली गेली, अशी धक्कादायक माहितीही जुनैदच्या चौकशीतून उघड झाली आहे.

Terrorist
घरातील माणसं गेली लग्नसोहळ्याला, परतल्यानंतर घरातील दृश्य बघून हादरले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील कारवाई दरम्यान 3 महिन्यांमध्ये जुनैदची संशयास्पद भूमिका समोर आली होती, त्यामुळे जुनैदला अकोल्याहून पुण्याला हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तपास यंत्रणांचा जुनैदवर संशय बळावला होता.मागील एका वर्षापासून तपास यंत्रणा जुनैदवर लक्ष ठेवून होत्या. दरम्यान, जुनैद मोहम्मद याने महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश,बिहार या राज्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित केल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आलं आहे. तसंच जुनैदने जम्मू-काश्मीरमध्ये काही जणांना दहशतवादी संघटनेत सहभागी केलं आहे, अशी धक्कादायक माहितीही उघड झाली आहे.

दरम्यान, यापूर्वीही पुण्यातून "टेरर फंडिंग" प्रकरणी एकाला अटक झाली होती. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून येणारा पैसा (Terror funding) भारताच्या वेगवेगळ्या भागात पोचविणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीप्रमुख रमेश शहा (वय 28, रा.गोपालगंज, बिहार) यास महाराष्ट्र व उत्तर प्रदेश "एटीएस'ने फेब्रुवारी २०१९ मध्ये पुण्यातून अटक केली होती. पोलिसांच्या भीतीने त्याने उत्तर प्रदेशमधून पलायन करून पुण्यात वास्तव्य केले होते. तो नेटकॉलींगद्वारे दहशतवाद्यांच्या हॅंडलरशी संपर्कात होता. त्यांच्याकडून मिळणारे पैसे तो देशातील विविध राज्यात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी देत होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com