Robbery
Robbery Saam TV

घरातील माणसं गेली लग्नसोहळ्याला, परतल्यानंतर घरातील दृश्य बघून हादरले

वडगाव-मावळ मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

वडगाव : मावळ मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मावळ येथील टाकवेमध्ये चोरट्यांनी (Thief) संधी साधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. घरातील माणंस नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी गेले होते. त्याचवेळी चोरट्यांनी दोन घरांमध्ये घुसून २७ तोळे सोनं (Gold Robbery) आणि सत्तर हजार रुपये रोख रक्कम चोरली. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील वाघमारे वस्तीतही चोरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा चोरांची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, याप्रकरणी मावळ पोलीस (Police)स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून मावळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Robbery
जग मंदीच्या लाटेवर, पण भारत सर्वात 'बेस्ट'; IMF म्हणतेय, टेन्शन घेऊ नका!

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ हद्दीतील टाकवे बुद्रुक येथे दिनेश असवले यांचं कुटुंब राहते. दिनेश आपल्या कुटुंबासोबत लग्नसोहळ्यासाठी गेले असता चोरट्यांनी संधी साधत दोन घरांमध्ये घुसून तब्बल २७ तोळे सोनं लंपास केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून रुममधील पंचवीस तोळे सोनं व दुसऱ्या घरातील दोन तोळे सोनं चोरी केलं.

तसंच सत्तर हजारांची रोकडही लंपास केली असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील वाघमारे वस्तीतही चोरी झाली होती. त्यामुळे दिवसेंदिवस चोरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरी झालेल्या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Edited by - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com