Farmers Loan Waiver: करुन दाखवलं! काँग्रेस सरकारने केली ३१, ००० कोटींची कर्जमाफी; ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा

Loan waiver of Farmers in Telangana: तेलंगणामधील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपुर्वी राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.
Farmers Loan Waiver: करुन दाखवलं! काँग्रेस सरकारने केली ३१, ००० कोटींची कर्जमाफी; ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
Loan waiver of Farmers in Telangana: Saamtv
Published On

दिल्ली, ता. २२ जून २०२४

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तेलंगणामधील काँग्रेस सरकारने ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी ३१ हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे.

तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय!

तेलंगणामधील रेवंत रेड्डी सरकारने १५ ऑगस्टपुर्वी राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 31,000 कोटी रुपयांच्या कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी दिले आहे.

प्रियांका गांधींचे ट्वीट!

तेलंगणा विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार तेलंगणामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. या कर्ममाफीने ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. छत्तीसगड, राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार असताना अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचं कर्ज केलं होतं, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

Farmers Loan Waiver: करुन दाखवलं! काँग्रेस सरकारने केली ३१, ००० कोटींची कर्जमाफी; ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी CM शिंदे मैदानात! अजित पवारांना शह देण्यासाठी मोर्चेबांधणी; दिवसभर बैठकांचा धडाका

राहुल गांधींनी केलं अभिनंदन

"तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन. तुमचे 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून 'किसान न्याय'ची प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने काँग्रेस सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे . ज्यामुळे 40 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबे कर्जमुक्त होतील. जे बोललो ते करुन दाखवले, काँग्रेस जिथे जिथे सरकार असेल तिथे ते भारताचा पैसा ‘भांडवलदारांवर’ खर्च करणार नाही, ‘भारतीयांवर’ खर्च करेल, " असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

Farmers Loan Waiver: करुन दाखवलं! काँग्रेस सरकारने केली ३१, ००० कोटींची कर्जमाफी; ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
Maharashtra Politics: विधानसभेसाठी 'तुतारी' वाजली, शरद पवारांची खास रणनिती; विश्वासू शिलेदारांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com