Tragedy : एकाच घरात ४ जणांचा गळफास, कॅन्सर झाल्यामुळे टाटा स्टीलच्या मॅनेजरचा टोकाचा निर्णय

Tata Steel Manager Ends Life : टाटा स्टीलमधील सिनियर मॅनेजर कृष्ण कुमार यांनी कॅन्सरच्या नैराश्यात पत्नी आणि दोन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली. झारखंडमध्ये ही दु:खद घटना घडली.
Tata Steel Manager Ends Life
Tata Steel Manager Ends Life Saam TV News
Published On

Ends Life With Wife And Children : कॅन्सर झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांसह गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज सकाळी झारखंडमध्ये ही हृदयविदारक घटना घडली. टाटा स्टील कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कृष्ण कुमार यांना कॅन्सर झाला होता. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यांनी दोन मुली आणि बायको यांच्यासह सामूहिक आत्महत्या केली. कृष्ण कुमार यांची सुसाइड नोट पोलिसांना मिळाली आहे. ही घटना समजताच झारखंडमध्ये खळबळ उडाली.

झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील आदित्यपूरमधील चित्रगुप्त नगर येथे आज सकाळी एकाच घरात चार जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. मृतांमध्ये टाटा स्टीलचे सिनियर मॅनेजर कृष्ण कुमार (४०), त्यांची पत्नी डॉली देवी (३५) आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही आत्महत्येची घटना असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Tata Steel Manager Ends Life
Gold Rate : सोनं खरेदीला जाताय? त्याआधी वाचा २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार यांना ब्लड कॅन्सर होता. या आजारामुळे आणि कौटुंबिक कलहामुळे ते नैराशात होते. त्यामुळेच त्यांनी पत्नी आणि मुलींसह आत्महत्या केल्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट देखील सापडली. त्यामध्ये कृष्ण कुमार यांनी आपल्या आजारपणाबरोबरच कौटुंबिक समस्यांचा आणि भविष्यात कुटुंबाचे काय होईल, याची चिंता व्यक्त केली आहे.

Tata Steel Manager Ends Life
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड, ऋषभ पंतकडे मोठी जबाबदारी, शार्दुलचे कमबॅक

सामूहिक आत्महत्याच्या घटनेची माहिती मिळताच बीडीओ अभय कुमार द्विवेदी आणि आदित्यपुर पोलीस ठाण्याचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. बीडीओ यांनी कृष्ण कुमार यांच्या वडिलांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, कृष्ण कुमार टाटा स्टीलमध्ये सिनियर मॅनेजर पदावर काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे उघड झाले होते. डॉली यांच्या सांगण्यावरून त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी केमोथेरपीचा सल्ला दिला होता. ही सुविधा जमशेदपूरमध्येही उपलब्ध असल्याने ते परत जमशेदपूरला आले. मात्र, केमोथेरपीसाठी रुग्णालयात जाण्याआधीच ही दु:खद घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com