Tamilnadu Crime : मायावतींच्या 'आर्मस्ट्रॉग'ला संपवलं; BSP नेत्याची घराबाहेरच ६ जणांकडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

BSP Leader killing News : मायावतींचे बहुजन समाज पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉग यांची हत्याची झाल्याची घटना घडली आहे. तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉग यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मायावतींच्या 'आर्मस्ट्रॉग'ला संपवलं; BSP नेत्याची घराबाहेरच ६ जणांकडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
Tamilnadu CrimeSaam tv

चेन्नई : तामिळनाडूमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बहुजन समाज पक्षाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग यांची चेन्नईत ६ जणांनी मिळून हत्या केल्याची घटना घडली आहे. बीएसपी नेत्याची पेरंबूर येथील सदायप्पन स्ट्रीट मार्गावर चाकू हल्ला करत हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बहुजन समाज पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्रॉंग हे सेम्बियम या गर्दीच्या ठिकाणी मित्र आणि समर्थकांसोबत संवाद साधत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

शुक्रवारी सांयकाळी सात वाजताच्या सुमारास ६ जण तीन वेगवेगळ्या दुचाकींवरून आले. या हल्लेखोरांनी आर्मस्ट्रॉंग यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आर्मस्ट्रॉंग यांचा मृत्यू झाला आहे. आर्मस्टाँगच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येनंतर देशभरातून बीएसपी कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

मायावतींच्या 'आर्मस्ट्रॉग'ला संपवलं; BSP नेत्याची घराबाहेरच ६ जणांकडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
Pune Crime News : पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ

नेमकं काय घडलं?

बीएसपी नेते आर्मस्ट्रॉंग हे सायंकाळच्या वेळेस समर्थकांशी बोलताना हल्लेखारांनी जीवघेणा हल्ला करत त्यांना संपवलं. त्यानंतर त्यांच्या मित्रांना धमक्या देऊन घटनास्थळावरून पळ काढला.

आर्मस्ट्रॉंग यांच्या आवाजाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य घराबाहेर आले. त्यावेळी त्यांच्या डोके आणि गळ्याला गंभीर दुखापत दिसली. त्यानंतर आर्मस्ट्रॉंग यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच डीसीपी आय ईश्वरन आणि एसीपी प्रवीण कुमार घटनास्थळी पोहोचले. या हत्याकांडानंतर पोलीस अधिकारी चिरंजीवी यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष पथक या हत्येची तपासणी करणार आहे.

मायावतींच्या 'आर्मस्ट्रॉग'ला संपवलं; BSP नेत्याची घराबाहेरच ६ जणांकडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
Pune Crime: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, डॉक्टरने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; पाहा VIDEO

दरम्यान, पोलिसांनी हत्या झालेल्या घटनास्थळी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. आर्मस्ट्रॉंग हे पेशाने वकील होते. त्यांनी २०२६ साली स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत एका वॉर्डातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुढे २००७ साली त्यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com