BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

BSP Latest News : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉऑर्डिनेटर पदावरून हटवलं आहे. आकाश आनंद यांच्या ऐवजी आता त्यांचे वडील आता जबाबादारी सांभाळणार आहेत.
Mayawati Latest News
Mayawati Latest NewsSAAM TV

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉऑर्डिनेटर पदावरून हटवलं आहे. आकाश आनंद यांच्या ऐवजी त्यांचे वडील आता त्या पदाची जबाबादारी सांभाळणार आहेत. माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पोस्ट करून याविषयी माहिती दिली आहे.

माजी मुख्यमंत्री मायावती यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, 'बहुजन समाज पक्ष एका राजकीय पक्षाबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मसन्मान , स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ देखील आहे. या चळवळीस कांशीराम यांनी संपूर्ण जीवन वाहून घेतलं. तसेच जीवन समर्पित केलं. या चळवळीला गती देण्यासाठी नवी पिढीला तयार केलं जात आहे'.

Mayawati Latest News
Hemant Soren: वाढलेली दाढी, गळ्यात मफलर; अटकेनंतर हेमंत सोरेन पहिल्यांदाच तुरूंगाबाहेर, नवा फोटो पाहिलात का?

'पक्षात लोकांना पुढे नेण्यासोबत, आकाश आनंद यांना नॅशनल कोऑर्डिनेटर आणि उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली होती. परंतु पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी त्याच्या परिपक्तवता येण्यासाठी दोन्ही महत्वाच्या पदावरून दूर केलं जात आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

Mayawati Latest News
Lok Sabha Election : ४० वर्षांच्या महिलेच्या ओळखपत्रावर मतदान करण्यासाठी आली 8 वीतील मुलगी, बोगस मतदानाचा Video आला समोर

मायावती यांनी त्यानंतर आकाश आनंद यांचे पिता आनंद कुमार यांना कॉर्डिनेटर या पदाची जबाबदारी सोपवली. बहुजन समाज पक्षाचे नेते पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग द्यायला मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Mayawati Latest News
Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

दरम्यान, मागील वर्षी १० सप्टेंबर २०२३ मध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत आकाश आनंद यांना मायावती यांनी उत्तराधिकारी घोषित केलं होतं. तसेच त्यांना पक्षाचा नॅशनल कॉर्डिनेटर केलं होतं. या घोषणेच्या आधीपासून आकाश हे त्यांच्या आत्यासोबत कार्यक्रमात दिसत होते.

२८ वर्षीय आकाश आनंद यांचा प्राथमिक शिक्षण नोएडामध्ये झालं आहे. त्यानंतर पुढे त्यांनी लंडनमधून 'एमबीए'ची पदवी प्राप्त केली. मार्च २०२४ मध्ये आकाश यांचा विवाह बसपाचे वरिष्ठ नेते अशोक सिद्धार्थ यांची कन्या प्रज्ञा यांच्याशी झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com