Lok Sabha Election : ४० वर्षांच्या महिलेच्या ओळखपत्रावर मतदान करण्यासाठी आली 8 वीतील मुलगी, बोगस मतदानाचा Video आला समोर

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेश भाजपने ट्विटर (X) अकाऊंटवर एका आठवीत शिकणाऱ्या मुलीचा बोगस मतदानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही मुलगी ४० वर्षांच्या महिलेचं मतदान ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर आली होती. त्यामुळे खळबळ माजली आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam Digital
Published On

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झालं. दरम्यान उत्तर प्रदेशमधील संभल मतदारसंघातून एक धक्कादायक माहिती बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश भाजपने ट्विटर (X) अकाऊंटवर एका आठवीत शिकणाऱ्या मुलीचा बोगस मतदानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ही मुलगी ४० वर्षांच्या महिलेचं मतदान ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर आली होती. त्यामुळे खळबळ माजली आहे.

भाजपने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी एका महिलेसोबत मतदान केंद्रावर पोहोचली आहे. यावेळी तिला विचारलं असता तिने सांगितलं की, ती ८ वीत शिकते आणि मतदानाची स्लीप आल्यानंतर ती मतदान करण्यासाठी आली होती.

कुंडरकी विधानसभेच्या बूथ क्रमांक ३९८ वर पीठासीन अधिकारी शमीम अहमद बनावट मतदान करत असल्याचं भाजपने म्हटलं आहे. एक अल्पवयीन मुलगी 40 वर्षीय महिलेची मतदान स्लीप घेऊन मतदान करण्यासाठी बूथवर आली होती. निवडणूक आयोगाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

Lok Sabha Election
Ratnagiri Sindhudurg: किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल, अखेरच्या काही मिनिटांत मतदानासाठी अवतरले; नारायण राणेंना बसणार फटका?

देशातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ९४ मतदारसंघात आज मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यात एकूण ६१.४५ टक्के जनतेने मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं पहायला मिळालं. आसामामध्ये ७५.२६ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर महाराष्ट्रात ५४.७७ टक्के मतदानाची नोंद झाली. बिहारमध्ये ५६.५५ टक्के, छत्तीसगडमध्ये ६६.९९ टक्के, दादरा नगरहवेलीमध्ये ६५.२३ टक्के आणि गोव्यात ७४.२७ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election
Maharashtra Politics 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंची 'मोहब्बत की दुकान'; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com