Maharashtra Politics 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंची 'मोहब्बत की दुकान'; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवणुकीत मतदानाच्या दिवशीच नवा ट्विस्ट आलाय. मतदानानंतर पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे थेट काटेवाडीतल्या अजित पवारांच्या घरी गेल्या. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या आई आशाताई यांची भेट घेतली.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

अक्षय बडवे

बारामती लोकसभा निवणुकीत मतदानाच्या दिवशीच नवा ट्विस्ट आलाय. मतदानानंतर पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे थेट काटेवाडीतल्या अजित पवारांच्या घरी गेल्या. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या आई आशाताई यांची भेट घेतली. आपण आशाकाकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचंही त्यांनी सांगितलं. तर सुप्रिया सुळे घरी आल्या तेव्हा आपण नव्हतो असं अजित पवारांनी सांगितलं. मात्र या भेटीमुळे बारामतीसह राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली असून पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण तयार झालंय.

पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे बारामतीच्या लढतीकडे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर सा-या देशाचं लक्ष आहे. कारण पवार विरूद्ध पवारच्या लढतीत अनेक नाट्यमय घडामोडी घडताय. याला मतदानाचा दिवसही अपवाद नाही. मतदान केल्यानंतर मविआ उमेदवार सुप्रिया सुळें थेट अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरी पोहोचल्या. आणि या भेटीची चर्चा अख्ख्या बारामतीत वाऱ्यासारखी पसरली. मात्र यामुळे केवळ बारामतीतच नव्हे तर सा-या महाराष्ट्रात संभ्रमाचं वातावरण परसलं. अजितदादांच्या घरात नेमकं काय घडलं

सुप्रिया सुळेंनी ही भेट कौटुंबिक असल्याचं म्हटलं तरीही राजकीय दृष्टिकोनातून ही भेट मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चितेंत साप़डलेल्या महायुतीच्या नेत्यांनी तातडीनं यावर खुलासा केला. आणि सुळेंची ही भावनिक खेळी असल्याचा निशाणा साधला. निवडणुकीनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा बारामतीसह राज्यातही वेळोवेळी रंगलीय. आता सुप्रिया सुळे थेट अजितदादांच्या घरीच गेल्यामुळे आणखी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातायत.

Maharashtra Politics 2024
Lok Sabha Election : काँग्रेसचा मोदींवर पलटवार; पाकिस्तान, बिर्याणीचा संबंध जोडत गंभीर आरोप

बारामतीच्या रिंगणात पहिल्यांदाच नणंद आणि भावजय अशी लढत होतेय. राष्ट्रवादीतील फूटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडली.. कधीकाळी विरोधकांना भिडणारे कार्यकर्तेही आता एकमेकांना भिडलेत. त्यामुळे पवार विरुद्ध पवारांच्या या संघर्षात सुप्रिया सुळेंची मोहब्बत की दुकान चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Maharashtra Politics 2024
Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com