Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Supreme Court : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना झटका दिला आहे. ढील सुनावणीत वैयक्तिक हजेरीतून सूट देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Ramdev Baba
Ramdev BabaSaam Digital
Published On

ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना झटका दिला आहे. ढील सुनावणीत वैयक्तिक हजेरीतून सूट देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केवळ आजच्या दिवशी सूट देण्यात आली होती. पुढील सुनावणीसाठी सवलतींची विनंती करून नये, असं न्यायालयाने म्हटलं आहे. यासंदर्भात आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) च्या अध्यक्षांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

पतंजली आणि इतर कंपन्यांशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने आज कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिराती प्रसिद्ध करण्यासंदर्भात अटी घातल्या आहेत. आता जाहिरातदाराला प्रसारमाध्यमांमध्ये कोणतीही जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी किंवा प्रकाशित करण्यापूर्वी सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागणार आहे. त्याशिवाय कोणतीही जाहिरात प्रकाशित किंवा प्रसारित केली जाणार नाही. ब्रॉडकास्टिंग सेवेवर चॅनलना सेल्फ डिक्लेरेशन प्रसारित करावे लागेल. सुप्रीम कोर्टाने FSSAI कडे आलेल्या तक्रारींवर केलेल्या कारवाईचा डेटाही आरोग्य मंत्रालयाकडून मागवला आहे.

तसंच पचंजलीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे, ती विक्रीसाठी पतंजलीची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. अन्यथा न्यायालयाला नोटीस पाठवावी लागेल असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

Ramdev Baba
These Habits Makes You Smart : अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला इतरांपेक्षा हुशार बनवतील, जाणून घ्या!

पुढील सुनावणीत वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात उत्तर देण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी केल्याप्रकरणीही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील सुनावणीत स्वत: हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 मे रोजी होणार आहे.

Ramdev Baba
Hanuman Chalisa Case : हनुमान चालिसा प्रकरण; राणा दाम्पत्याला ९ मे रोजी हजर राहण्याचे न्यायालयाचे निर्देश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com