Swami Chaitanyananda Saraswati: स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी, १७ विद्यार्थिंनीचं केलं होतं विनयभंग

Swami Chaitanyananda Saraswati Case: एका खाजगी संस्थेत १७ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्या प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आलीय. आरोपी स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी लूकआउट सर्क्युलर जारी केलाय.
Swami Chaitanyananda Saraswati Case
Delhi Police issue lookout circular against Swami Chaitanyananda Saraswati after molestation case filed by 17 students.saam tv
Published On
Summary
  • स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर १७ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप.

  • दिल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केलं.

  • विद्यार्थिनींनी छळ आणि गैरवर्तनाची तक्रार पोलिसांकडे केली.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी स्वामी चैतन्यनंद सरस्वती हे नैऋत्य दिल्लीतील श्री शारदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये संचालक (व्यवस्थापन समितीचे सदस्य) आहेत. दरम्यान पोलिसांना तपासादरम्यान संस्थेच्या तळघरात बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट क्रमांक 39 UN 1 असलेली व्होल्वो कार सापडलीय. स्वामी चैतन्यनंद सरस्वती ही कार वापरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

याआधीही स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर आरोप झालेत. पोलिस सूत्रांनी सांगितलं की, २००९ मध्ये डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तर २०१६ मध्ये वसंत कुंज पोलीस ठाण्यातही विनयभंगाची दुसरी तक्रार दाखल करण्यात आली होती. ताज्या प्रकरणाची तक्रार वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलीय.

Swami Chaitanyananda Saraswati Case
१७ मुलींचा आश्रमात विनयभंग केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार

यापैकी १७ जणांनी सरस्वतीवर अपशब्द वापरल्याचा,अश्लील संदेश पाठवल्याचा आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी संस्थेतील प्राध्यापक आणि प्रशासक म्हणून काम करणाऱ्या तीन महिलांनी आरोपीला त्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महिला विद्यार्थिनींवर दबाव आणून प्रोत्साहित केल्याचा आरोप आहे. त्यांच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Swami Chaitanyananda Saraswati Case
Nursery Student Heart Attack: नर्सरीतून घरी येताना ५ वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका; बसमध्येच चिमुकलीचा मृत्यू

पोलिसांनी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली व्होल्वो कार जप्त केली आहे. दरम्यान श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणाम्नय श्री शारदा पीठम, शृंगेरी यांनी या घटनेपासून स्वतःला वेगळे करत एक सार्वजनिक निवेदन जारी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com