१७ मुलींचा आश्रमात विनयभंग केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार

Swami Chaitanyanand case : दिल्लीतील वसंतकुंज आश्रमातील १७ मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला असून शेवटचे लोकेशन आग्रा येथे आढळले.
Swami Chaitanyanand
Swami Chaitanyanand molestation case latest news Delhi ANI
Published On

Swami Chaitanyanand molestation case latest news Delhi : आश्रमात १७ मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप झाल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला आहे. दिल्लीमधील वसंतकुंज आश्रमात त्यांनी मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३२ मुलींचा जबाब नोंदवला आहे. त्यामधील १७ मुलींनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वसंतकुंज पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा दिल्लीमध्ये वसंतकुंज येथे एका प्रसिद्ध आश्रमात संचालक पदावर काम करत होता. आश्रमातील मुलींचा विनयभंग, अश्लील मेसेज केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीचे नाव चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी असे आहे. त्याच्या Volvo कारमधून बनावट 39 UN 1 नंबर मिळाला आहे. पोलिसांनी गाडी जप्त केली आहे. फरार स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा शोध पोलीस करत आहेत. आश्रम प्रशासनाने स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला पदावरून काढून टाकले आहे. दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचा फोटोही जारी केला आहे.

शेवटचे लोकेशन कोणतं ?

१७ मुलींनी विनयभंग केल्याच आरोप केल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्याशिवाय आश्रम प्रशासनाने त्याला पदावरून काढून टाकले. स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने अटकेच्या भीतीने पळ काढला आहे. पोलिसांकडून त्याचा तपास केला जात आहे. त्याचं अखेरचे लोकेशन आग्रा येथे असल्याचे तपासात समोर आले. दिल्ली पोलिसांनी याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांकडे संपर्क केला आहे. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून संयुक्त ऑपरेशन करण्यात येतेय. दरम्यान, या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पीडित मुलींचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Swami Chaitanyanand
Solapur Flood News : महामार्ग बंद; लालपरीची चाके थांबली, वंदे भारत एक्सप्रेस ठप्प, सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे मेगाहाल

श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे व्यवस्थापक स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थसारथी यांच्यावर संस्थेत ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत पीजीडीएम अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थिनींचा छेडछाड केल्याचा आरोप आहे. ३२ विद्यार्थिनींचे जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आले. त्यापैकी १७ जणांनी अपशब्द वापरल्याचा, अश्लील व्हॉट्सअॅप/एसएमएस संदेश पाठवल्याचा आणि त्यांच्याकडून अवांछित शारीरिक संपर्क साधल्याचा आरोप आहे. वसंतकुंज पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली त्याची कार पोलिसांनी जप्त केली आहे. तो फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Swami Chaitanyanand
धुरळा उडाला! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट, आयोगाने घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com