Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Supreme Court News: दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी म्हणजेच 10 मे रोजी आपला निर्णय देऊ शकते.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam Digital

Arvind Kejriwal News:

दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी म्हणजेच 10 मे रोजी आपला निर्णय देऊ शकते. या खटल्यातील अटकेविरोधात केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे नेतृत्व करणारे न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की, आम्ही शुक्रवारी अंतरिम आदेशावर निर्णय घेऊ. अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्य खटल्याचा निर्णयही त्याच दिवशी दिला जाणार आहे.

याआधी मंगळवारी केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका झाल्यास त्यांनी फक्त त्यांच्या पक्षाच्या संबंधित कामे करावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं होते.

Arvind Kejriwal
JP Nadda: सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर व्हा, जेपी नड्डा यांना कर्नाटक पोलिसांची नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ''निवडणुकीमुळे आम्ही तुम्हाला अंतरिम जामीन मंजूर केलास, यानंतर जर तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयात काम करणार असल्याचं म्हटलं, तर त्याचा व्यापक परिणाम होऊ शकतो. आम्ही तुम्हाला अंतरिम जामीन मंजूर केल्यास, तुम्ही मुख्यमंत्रीपदाची अधिकृत कर्तव्ये पार पाडावीत, अशी आमची इच्छा नाही. सरकारच्या कामकाजात तुमचा हस्तक्षेप आम्हाला अजिबात नको नकोय.''

यावर केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी म्हणाले पदूा की, ''अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर केजरीवाल कोणत्याही अधिकृत फाइलवर स्वाक्षरी करणार नाहीत. मात्र दिल्लीचे नायब राज्यपालांनीही फायलींवर त्यांची स्वाक्षरी नाही, म्हणून कोणतेही काम अडकू नये.''

Arvind Kejriwal
Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले होते की, ''आधी अंतरिम जामीन देता येईल की, नाही हे पाहावे.'' यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, निवडणुकांमुळे केजरीवाल यांच्याबाबत कोणतीही उदारता दाखवू नये. सर्वोच्च न्यायालयाने असे केले तर ते चुकीचे उदाहरण ठरेल. केजरीवाल यांना अंतरिम जामीन देणे म्हणजे राजकारण्यांसाठी वेगळा वर्ग निर्माण करण्यासारखे होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com