Karnataka News:
कर्नाटक पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे सदस्य अमित मालवीय नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये त्यांना सात दिवसांत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्नाटक भाजपने पोस्ट केलेल्या ट्विटच्या संदर्भात पोलिसांनी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे.
या ट्विटमध्ये एससी / एसटी समुदायाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की, ''नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत सकाळी 11 वाजता हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे निर्देश आपणास दिले जात अहेत.''
याआधी मंगळवारी पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला भाजप राज्य युनिटने शेअर केलेला ॲनिमेटेड व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, याच प्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने (KPCC) निवडणूक आयोगाकडे जेपी नड्डा आणि इतर भाजप नेत्यांवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने आरोप केले अहेत की, भाजपने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये कथितरित्या एससी आणि एसटी सदस्यांना विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यापासून धमकावले आहे.
सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि कर्नाटक युनिटचे प्रमुख बी वाय विजयेंद्र यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.