सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी! 20 जागा, पगार तब्बल 2 लाख; कोण करू शकतं अर्ज?

Supreme Court Court Master Recruitment 2026 Apply Online: सुप्रीम कोर्ट भरती 2026 अंतर्गत कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदाच्या 20 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून वेतन, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या.
SUPREME COURT RECRUITMENT 2026
SUPREME COURT RECRUITMENT 2026saam tv
Published On: 

सुप्रीम कोर्टात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सुप्रीम कोर्टाने कोर्ट मास्टर (शॉर्ट हँड) पदाच्या 20 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700 रुपयांपासून ते 2,08, 700 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. मात्र या भरतीसाठी फक्त पदवीधर (Graduate) असणे पुरेसे नाही, उमेदवारांना इंग्रजी शॉर्टहँड आणि टायपिंगचे कौशल्य तसेच संबंधित पदावरील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. जाणून घ्या या भरतीसाठी पात्रता, वयोमार्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क याबाबतीची सविस्तर माहिती.

SUPREME COURT RECRUITMENT 2026
Good News : मोठी बातमी !एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

सुप्रीम कोर्टातील कोर्ट मास्टर पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 25 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 15 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

कोण अर्ज करू शकतो? पात्रता काय?

कोर्ट मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच खालील अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

इंग्रजी शॉर्टहँड: प्रति मिनिट 120 शब्दाचा स्पीड आवश्यक

टायपिंग स्पीड: संगणकावर इंग्रजी टायपिंगचा स्पीड प्रति मिनिट 40 शब्द असावा.

कामाचा अनुभव: सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा वैधानिक संस्थेमध्ये संबंधित पदावर किमान पाच वर्षांची नियमित सेवा आवश्यक.

अनुभवाची पदे: प्रायव्हेट सेक्रेटरी, सीनियर पर्सनल असिस्टंट, पर्सनल असिस्टंट किंवा सीनियर स्टेनोग्राफर या सगळ्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

वयोमर्यादा किती?

या भरतीसाठी 1 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 30 वर्षे आणि जास्तीत जास्त 45 वर्ष असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC-नॉन क्रिमी लेयर) आणि माजी सैनिकांना नियमानुसार वयोमर्यादीत सूट दिली जाणार आहे. कोर्ट मास्टर पदासाठी उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाणार आहे.

SUPREME COURT RECRUITMENT 2026
Ration Card Update: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद, कसं तपासाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

कोर्ट मास्टर पदासाठी उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाणार आहे.

1लेखी परीक्षा: 100 गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेतली जाईल. यामध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान, भारतीय संविधानातील न्यायपालिकेशी संबंधित तरतुदी, सुप्रीम कोर्टाचे नियम आणि संगणक संचालन यावर प्रश्न विचारले जातील.

2 इंग्रजी शॉर्टहँड टेस्ट: उमेदवारांच्या शॉर्टहँड कौशल्याची चाचणी घेतली जाईल.

3 टायपिंग टेस्ट: संगणकावर इंग्रजी टायपिंगच्या वेगाची चाचणी होईल.

4 मुलाखत: अंतिम टप्प्यात पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.

लेखी परीक्षेत पात्र ठरण्यासाठी किमान 50 गुण मिळवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी Negative Marking लागू नसणार.

अर्ज शुल्क किती भरावे लागेल?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रवर्गानुसार शुल्क भरावे लागेल.

सर्वसाधारण आणि खुला प्रवर्ग (OPEN) : 1,500 रुपये

SC, ST, OBC (नॉन क्रीमी लेयर) आणि माजी सैनिक:750 रुपये

तसेच बँकेचे अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते. अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

किती मिळणार पगार?

कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणीनुसार दरमहा 67,700 ते 2,08,700 रुपये वेतन मिळेल. तसेच नियमानुसार इतर भत्तेही दिले जाणार आहेत. त्यामुळे पदवी, इंग्रजी शॉर्टहँडमधील कौशल्य, संगणक टायपिंगचा वेग आणि आवश्यक कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी ठरू शकते. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत भरती अधिसूचनेतील सर्व अटी आणि नियम तपासून घ्यावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com