Supreme court : बिल्किस बानो यांच्या पदरी निराशा; सुप्रीम कोर्टाने ११ दोषींच्या सुटकेच्या आक्षेपावरील याचिका फेटाळली

११ दोषींच्या सुटकेवर आक्षेप घेणाऱ्या दोन याचिकांपैकी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Supreme court
Supreme court saam tv
Published On: 

Bilkis Bano News : गुजरात दंगलीमधील ११ दोषींच्या सुटकेवर आक्षेप घेणाऱ्या दोन याचिकांपैकी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे बिल्किस बानो यांना मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

कोणती याचिका फेटाळली?

2002 च्या गुजरातमधील (Gujarat) हिंसाचारात बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या करणाऱ्या ११ दोषींची सुटका करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे २०२२ ला दिला होता. या आदेशाचा पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी बिल्किस बानो यांनी पुनर्विचार याचिकेद्वारे केली होती.

मे 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दोषींच्या सुटकेच्या याचिकेवर विचार करण्यास सांगितले होते. गुजरात सरकारच्या उत्तरानंतर सर्वोच्च न्यायालयाने या दोषींची चांगल्या व्यवहाराच्या धर्तीवर 15 ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मात्र, ज्या आधारावर या आरोपींची सुटका करण्यात आली होती. त्याविरोधात बिल्किस बानो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.

जे चुकीचं आहे, त्याच्याविरुद्ध लढणार आहे : बिल्किस बानो

११ दोषींची सुटका झाल्यानंतर बिल्किस बानो म्हटल्या होत्या, 'जे चुकीचं आहे, त्याच्याविरुद्ध लढणार आहे. माझं संपूर्ण कुटुंब आणि आणि जीवन उद्धवस्त करणाऱ्या सुनावणीनंतर खूप वेळ स्तब्धच उभी राहिली होती'.

'मला देशाच्या विविध भागातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे माझ्या उमेद जागृत झाली आहे. यामुळे मला एकटेपणा भासला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लढणार आहे. जे चुकीचं आहे, त्याच्याविरुद्ध लढणार आहे', असेही बिल्किस बानो म्हणाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.