Stampede : चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ऐतिहासिक किल्ल्यावरील उत्सवात गदारोळ

stampede incidents UNESCO World Heritage Fort : हैतीमधील लाफेरिएर किल्ल्यावर आयोजित उत्सवात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या गोंधळात ही भीषण दुर्घटना घडली असून बचावकार्य सुरू आहे.
stampede incidents  UNESCO World Heritage Fort
stampede incidents UNESCO World Heritage Fort Google
Published On

ऐतिहासिक किल्ल्यावरील उत्सवात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. हैतीमधील प्रसिद्ध लाफेरिएर सिटाडेल (Laferriere Citadel) या किल्ल्यावर शनिवारी एका वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आणि विद्यार्थी जमा झाले होते. मात्र, अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे (Stampede) ३० लोकांचा जीव गेला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लाफेरिएर सिटाडेल हा किल्ला युनेस्को जागतिक वारसा (UNESCO World Heritage) स्थळ असल्याने नेहमीच गर्दी असते. दुर्घटनेच्या वेळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. पावसामुळे लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या प्रयत्न केला पण त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य (Rescue Operation) सुरू केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

stampede incidents  UNESCO World Heritage Fort
लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी महिलांकडे केली शरीरसुखाची मागणी; महाराष्ट्रात संतापाची लाट

पावसाने गर्दीवर काळाचा घाला

चेंगराचेंगरीची दुर्घटना लाफेरिएर सिटाडेल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. उत्सवासाठी हजारो लोक जमले होते. सर्वजण उत्साहात होते. पण अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. त्यातच एकमेकांना धक्का लागून लोक खाली पडले. लोक एकमेकांच्या अंगावर पडल्याने गुदमरून आणि दबल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे मृतांमध्ये तरुणांचा समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

stampede incidents  UNESCO World Heritage Fort
DA Hike : दर महिन्याला ११२५० रुपयांचा क्लेम; सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबाबत सरकारची मोठी अपडेट

पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

हैतीचे पंतप्रधान अलेक्स डिडियर फिल्स-एमे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आहे. सरकार पीडितांच्या पाठीशी असल्याचे ते म्हमाले. हैती देश आधीच गँगवॉर, गुन्हेगारी आणि गरिबीसारख्या अडचणीचा सामना करत आहे. त्यातच नव्या संकटाने लोकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सध्या प्रशासनकडून देशातील नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

stampede incidents  UNESCO World Heritage Fort
Aadhaar Offline KYC : न OTP येणार, न बायोमेट्रिक्स लागणार! आधार कार्डमध्ये झाला मोठा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com