Shrinagar: श्रीनगरमध्ये ३ मोठे स्फोट, विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन, नागरीक भयभीत

Srinagar Airport Blast and Drone Incident Creates Panic: श्रीनगर परिसरात सलग तीन मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर, श्रीनगर विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन दिसले आहे.
Airport:
Airport:Saam Tv
Published On

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. श्रीनगर परिसरात सलग तीन मोठे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर, श्रीनगर विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन दिसले असून, ड्रोनविरोधी क्षेपणास्त्रांनी त्या ड्रोनवर मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर विमानतळ परिसरातील वीज बंद करण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे श्रीनगरमध्ये झालेल्या अनेक भीषण स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११:४५ च्या सुमारास श्रीनगर विमानतळाजवळ दोन मोठे स्फोट झाले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी आणखी एका स्फोटमुळे वातावरण दणाणून गेले.

Airport:
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ, ११ मेपासून 'या' गोष्टींना बंदी, भारत पाकिस्तान युद्ध तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

भारतीय लष्कराने पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले उधळून लावले आहे. काही तासांपूर्वी श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर काही भागात सायरनचे आवाज ऐकू आले. सीआयएसएफने निवडक विमानतळांवर नागरी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. तसेच विमानतळावरील वीज देखील घालवण्यात आली.

Airport:
Maharashtra: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट; प्रमुख शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

दल सरोवरावर सापडला क्षेपणास्त्र

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील प्रमुख पर्यटन आकर्षण असलेल्या दल सरोवरात एक क्षेपणास्त्रासारखी वस्तू सापडली आहे. तलावातून धूर येऊ लागल्यानंतर याची माहिती मिळाली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com