Special Report
Special ReportSaam Digital

Special Report : एलियन्स खूप आधीपासूनच पृथ्वीवर फिरतायत? वेगवेगळ्या रुपात एलियन्सचं वास्तव्य? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Aliens On Earth : हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी एलियन्स खूप आधीपासूनच पृथ्वीवर दाखल झालेत असा दावा केला आहे. त्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचा दावा कितपत खरा आहे. भारतात एलियन्स आहेत का? हादेखील संशोधनाचा भाग आहे.
Published on

आता बातमी आहे काळजाचा ठोका चुकवणारी. तुम्हाला रात्री अपरात्री एलियन दिसला तर घाबरू नका. आम्ही म्हणतोय की एलियन्स दिसला तर घाबरका नका कारण, एलियन्स माणसांप्रमाणे पृथ्वीवर वास्तव्यास आहेत. आणि त्यांना भेटायलाही त्याचे मित्र येतात. हे सगळं खरं आहे असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे हे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकलाच असेल मात्र, आम्ही याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

एलियन्स पृथ्वीवर फिरतायत, कधी, कुठेही, केव्हाही दिसतील. कारण एलियन्स माणसांप्रमाणेच फिरतायत. त्यामुळे सावध व्हा, असा मेसेज व्हायरल होतोय, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात. पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्या एलियन्स मित्रांना भेटण्यासाठी या तबकड्यांमध्ये बसून ग्रहा वरील एलियन्स पृथ्वीवर येत असावेत. पृथ्वीवर आपल्या अवतीभवती या परग्रहवासी जीवांची एखादी संस्कृती नांदत असावी.

हा मेसेज व्हायरल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय तर काहींना याची भीती देखील वाटू लागली आहे. एलियन्स कसे असतील? ते आपल्यावर हल्ला करतील का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेयत. त्यामुळे याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने या व्हायरल मेसेजची पडताळणी सुरू केली.

Special Report
NEET Exam Paper Leak Case : NEET परीक्षेसंदर्भात मोठी बातमी! विद्यार्थ्यांचे गुण वेबसाईटवर प्रसिद्ध होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश

व्हायरल सत्य

हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी हा दावा केलाय

एलियन्स खूप आधीपासूनच पृथ्वीवर दाखल झालेत

एलियन्स वेगवेगळे अवतार धारण करून आपल्यासोबत राहतात

पृथ्वीवरील एलियन्सच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे आणि सिद्धांत

उडत्या तबकड्यांतून एलियन्सला त्याचे मित्र भेटायला येतात

त्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचा दावा कितपत खरा आहे. भारतात एलियन्स आहेत का? हादेखील संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे असे मेसेजजरी व्हायरल होत असले तरी भीती बाळगायची आवश्यकता नाही.

Special Report
Jammu Kashmir Terrorist Attack: कुपवाडात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री; २ दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com