VIDEO : फुटबॉल मॅचदरम्यान घडली भयंकर घटना; चेंगराचेंगरीत ५६ जणांनी गमावला जीव, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

South Guniea Football Match update : फुटबॉल मॅचदरम्यान भयंकर घडली. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ५६ जणांनी जीव गमावला आहे.
फुटबॉल मॅचदरम्यान घडली भयंकर घटना; चेंगराचेंगरीत ५६ जणांनी गमावला जीव, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
South Guniea Football Match updateSaam tv
Published On

नवी दिल्ली : फुटबॉलच्या मैदानावरून धक्कादाय घटना समोर आली आहे. आफ्रिकी देश दक्षिण गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरीचा घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर शेकडो लोक जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रिपोर्टनसार, दक्षिण गिनी देशातील सर्वात मोठं शहर एनजेराकोरेमध्ये फुटबॉल टुर्नामेंटमध्ये एका सामन्यादरम्यान दोन्ही संघामध्ये वाद झाला. या वादानंतर स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची धावपळ उडाली. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 56 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फुटबॉल मॅचदरम्यान घडली भयंकर घटना; चेंगराचेंगरीत ५६ जणांनी गमावला जीव, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
Viral Video : फक्त टॉवेल गुंडाळून 4 मुली चढल्या मेट्रोत, पुढे काय घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क 

मॅचदरम्यान, एका निर्णयाने दोन संघात वाद झाला. यामुळे दोन्ही संघाचे समर्थक एकमेकांना भिडले. यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या भीषण घटनेनंतर तेथील सरकारने घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, देशाचे राष्ट्राध्यक्ष ममाडी डुमबोया यांच्या सन्मानार्थ आयोजित टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात ही घटना घडली. लेबा आणि एनजेराकोरे संघामध्ये हा वाद झाला. मॅचदरम्यान रेफरीने दिलेल्या निर्णयावर वाद पेटला. यानंतर दोन्ही संघाचे समर्थक एकमेकांना भिडले. दोन्ही संघाच्या समर्थकांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर लोकांची एकच धावाधाव पाहायला मिळाली.

फुटबॉल मॅचदरम्यान घडली भयंकर घटना; चेंगराचेंगरीत ५६ जणांनी गमावला जीव, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
Viral News: घोर कलियुग! 24 वर्षाच्या मुलीने 50 वर्षाच्या बापासोबत केलं लग्न, व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही

या घटनेनंतर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये सामना पाहायला आलेले चाहते भिंतीवरून उडी मारताना दिसत आहे. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

फुटबॉल मॅचदरम्यान घडली भयंकर घटना; चेंगराचेंगरीत ५६ जणांनी गमावला जीव, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद
Social Media : तुम्ही सोशल मीडियाचा वापर जास्त करता का? यामुळे होऊ शकते नुकसान..

सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. फुटबॉल मैदानावरही अनेक मृतदेह दिसत आहेत. रुग्णालयातही मृतदेहांचा खच पडला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com