Sonia Gandhi: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय? सोनिया गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाल्या...

Sonia Gandhi: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
Sonia Gandhi Letter to PM Narendra Modi:
Sonia Gandhi Letter to PM Narendra Modi:Saam tv

प्रमोद जगताप

Sonia Gandhi write Letter to PM Narendra Modi:

मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर रोजी असणार आहे. मात्र, या अधिवेशनाचा अजेंडा काय, याबद्दल विरोधी पक्षांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. मोदी सरकारने या अधिवेशनाचा अजेंडा सांगावा, असा प्रश्न करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, विरोधी पक्षांना विशेष अधिवेशनाबद्दल काहीच सांगण्यात आलेलं नाही. विशेष अधिवेशन आयोजित करण्याआधी चर्चा करून मान्यता मिळवली आहे. या अधिवेशनाच्या आधी अजेंड्याची सहमती मिळवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, पहिल्यांदा बैठक बोलाविण्यात आली, त्याचा अजेंडाच तयार नाही'. सोनिया गांधी यांनी मोदींना पत्र लिहित ९ मुद्दे उपस्थित केले आहेत.

Sonia Gandhi Letter to PM Narendra Modi:
Political News : एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जातेय? असीम सरोदेंनी उपस्थित केला सवाल

सोनिया गांधी यांच्या पत्रातील 9 मुद्दे कोणते?

1 - देशातील महागाई, बेरोजगारी आणि देशाची अर्थव्यवस्था

2 - शेतकऱ्यांच्या एमएसपी कायद्यावर काय कारवाई झाली? याबाबत विचारणा करण्यात येईल.

3 - उद्योजक गौतम अदानी यांच्यावर नवा आरोप झाला, त्यावर चर्चा, जेपीसी चौकशीची मागणी पत्रात करण्यात आली.

4 - देशात जातीय जनगणना झाली पाहिजे. 2021ची जनागणना आतापर्यंत झाली नाही,याबद्दल विचारणा पत्रात करण्यात आली .

5 - केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वादावर चर्चा झाली पाहिजे. अनेक राज्य याच मुद्यावरून चिंतेत असल्याचे पत्रात अधोरेखित करण्यात आलं आहे.

6 - नैसर्गिक आपत्ती अनेक ठिकाणी आल्या. हिमाचलमध्ये त्यामुळं मोठं नुकसान झालं, पण केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती घोषित केली नाही, याबद्दलही पत्रात विचारणा करण्यात आली.

7 - चीन आपल्या जमिनीवर कब्जा करून बसला आहे. या मुद्यावर मागच्या 3 वर्षांपासून चर्चा झाली नाही, याबद्दलही विचारणा केली.

8 - देशात जातीय आणि सांप्रदायिक तणाव निर्माण केला जात आहे. हरियाणातील नुह असेल किंवा इतर ठिकाण, भीतीच वातावरण बनलेलं आहे, त्यावर चर्चा व्हावी, असे त्यांनी म्हटलं आहे .

Sonia Gandhi Letter to PM Narendra Modi:
INDIA or BHARAT : ''इंडिया' नव्हे भारत? नामांतर पाकिस्तानच्या पथ्यावर पडणार? पाकिस्तान करु शकतो मोठा दावा

9 - मणिपूर मुद्यावर चर्चा व्हावी. आजही राजधानी इंफाळमध्ये ५ दिवसांचा कर्फ्यू लावलेला आहे. एकीकडे जी-20 धुमधडाक्यात साजरा करत आहोत, पण मणिपूर म्हणावं तस शांत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com