INDIA or BHARAT : ''इंडिया' नव्हे भारत? नामांतर पाकिस्तानच्या पथ्यावर पडणार? पाकिस्तान करु शकतो मोठा दावा

Political News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हटलं आहे.
India-pakistan update
India-pakistan updatesaam tv
Published On

INDIA vs Bharat Name :

भारत की इंडिया... देशभरात सध्या हा विषय सर्वाधिक चर्चिला जातोय. देशाचं नाव आता इंडिया ऐवजी भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्याचीही चर्चा आहे.

येत्या १८ ते २२ सप्टेंबर या काळात मोदी सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या विशेष अधिवेशनात देशाचं नाव बदलण्याचं विधेयक मोदी सरकारकडून सादर केले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हटलं आहे. जी २० च्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर तसा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र भारतात सुरु असलेल्या या नामांतराच्या चर्चेत पाकिस्तान मोठी संधी साधण्याची शक्यता आहे. कारण इंडिया नाव वगळलं तर त्यावर पाकिस्तान दावा करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

India-pakistan update
India Name Change: मोदी सरकार 'इंडिया' ला कसं करणार दूर; संसदेत कसं बदलणार देशाचं नाव जाणून घ्या प्रक्रिया

पाकिस्तानच्या लोकल मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया नावाची मान्यता अधिकृतपणे रद्द झाल्यास पाकिस्तान इंडिया नावावर दावा करु शकतो. पाकिस्तान अनेक वर्षांपासून सांगत आला आहे की इंडिया हे नाव सिंधू क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे जर इंडिया नाव वगळलं तर कदाचित पाकिस्तान यावर दावा करु शकतो. (Latest News Update)

India-pakistan update
President Of Bharat: जी20 च्या डिनर निमंत्रण पत्रातून Indiaनाव वगळलं, काँग्रेसचा हल्लाबोल

South Asia Index reportच्या रिपोर्टनुसार भारताने संयुक्त राष्ट्र स्तरावर इंडिया नाव वगळलं तर पाकिस्तान यावर दावा करु शकतो. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना यांनी देखील इंडिया नावाला विरोध केला होता. त्यांना हिंदुस्थान किंवा भारत नाव सुचवलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com