

सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली
रुग्णालयात उपचार सुरू आहेत
रुग्णालयात न त्यांचा पहिला संदेश आला समोर
२० जुलैला संसदेवर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे देशवासीयांना आवाहन
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे २८ जूनपासून दिल्लीतील जतंर मंतर मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी पहिला मेसेज जारी केला आहे. त्यांनी २० जुलै रोजी होणऱ्या 'चला संसदेवर' या मोर्चाला भारतातील दुसरी स्वातंत्र्य चळवळ असे म्हटले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
दिल्लीच्या जंतर मंतरवर २१ दिवसांच्या उपोषणानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्याठिकाणी डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे पाहून दिल्ली पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी त्यांना अचानक जंतर मंतरवरून रुग्णालयात दाखले केले. यादरम्यान रुग्णालय प्रशासनही त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत आहे. डॉक्टरांच्या मते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावे. मात्र, वांगचुक यासाठी तयार नाहीत. ते उपोषणावर ठाम आहेत.
सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून एक मेसेज पाठवला आहे.रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण सोडलेले नाही. दरम्यान, दिल्लीतील रुग्णालयातून सोनम वांगचुकने एक विशेष मेसेज पाठवला आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी २० जुलैचा उल्लेख केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी याला दुसरं स्वातंत्र्यासाठीचे आंदोलन म्हटले आहे. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात वांगचुकने आपल्या समर्थकांना एक विशेष संदेश पाठवला आहे .
सोनम वांगचुकने रविवारी सकाळी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट टकली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, '२० जुलै ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ. भीतीमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत.' त्यांनी पुढे लिहिले की, 'अन्यायापासून मुक्ती (जसे की पेपरफुटी) आणि भीतीपासून मुक्ती (माझी बेकायदेशीर अटक). भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ. संसदेवर मोर्चा. कृपया हा मोर्चा प्रचंड यशस्वी करा.'
दरम्यान, वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग रुग्णालयाने रविवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे हेल्थ बुलेटिन जारी केले. जंतर मंतर येथे उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी रुग्णालयात दाखल केले होते. सफदरजंग रुग्णालयाने हेल्थ बुलेटिन जारी करून सांगितले की, सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.