Shocking: मध्यरात्री आईच्या बेडवर परपुरूष, मुलाची सटकली; आईच्या प्रियकराला लाकडी दांडक्यानं संपवलं

Son Kills Mother Lover: आईच्या अवैध संबंधांमुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह शेतात पुरून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. आईच्या अवैध संबंधांमुळे संतप्त झालेल्या तरुणाने तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह शेतात पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी तरुण अविनाश याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अविनाश असे आरोपीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना मुझफ्फरपूरमधील तुर्की पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. मृत तरूण ७ मे पासून बेपत्ता होता. मृत तरूणाच्या पत्नीने २० मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता मृतदेह सापडला. पोलिसांनी सांगाडा बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Crime News
Ajit Pawar: दादांनी दिला १० हजारांचा वादा! ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना आर्थिक मदत; अजित पवारांची घोषणा

नेमकं प्रकरण काय?

आरोपी अविनाशची आई आणि जितूचे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध संबंध होते. ही बाब अविनाशला काही पटलेली नाही. पाच वर्षांपूर्वी अविनाशने आपल्या आईला जितूसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यामुळे त्याला मानसिक धक्का बसला. ७ मे रोजी जितू त्याच्या घरी गेला होता. रात्री १२ वाजता त्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दोघांमध्ये भांडण झालं.

भांडणाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर जितू शेताकडे पळून गेला. अविनाशही त्याच्या मागे पळाला आणि लाकडी बांबूने त्याचं डोकं फोडलं. यात जितू गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर अविनाश धावत घरी गेला आणि कुदळ घेऊन आला. तिथेच एक खड्डा खोदला आणि जितूचा मृतदेह तिथेच पुरला. त्याने जितूचा मोबाईल फोन तोडून झुडपात फेकला, जेणेकरून कोणताही पुरावा उरू नये.

Crime News
Pune crime: तोंडावर रूमाल अन् हातात कोयता, पुण्यातील कॅफेबाहेर तरूणांचा राडा, घटना CCTV मध्ये कैद

जितू ७ मेपासून बेपत्ता होता. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर २० मे रोजी त्याच्या पत्नीने तुर्की पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. २३ मे रोजी गावातील काही नागरिकांनी शेतात जमिनीतून मानवी पाय बाहेर येताना पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शेत खोदल्यावर मृतदेह सापडला, जो कपड्यांवरून आणि बेल्टवरून जितूचा असल्याचे ओळखण्यात आले.

गुन्ह्याची कबुली

पोलिस तपासात अविनाशवर संशय घेण्यात आला. चौकशीत त्याने संपूर्ण गुन्हा कबूल केला. पोलिसांनी हत्येत वापरलेला कुदळ आणि जितूचा मोबाईल फोन जप्त केला आहे. या प्रकरणावर एसडीपीओ अनिमेश चंद्र ग्यानी यांनी सांगितले की, “मृताच्या पत्नीने २० मे रोजी तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला. तपासादरम्यान जितू राम याचे एका विवाहित महिलेशी अवैध संबंध असल्याचे समोर आले. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com