निवृत्त बँक कर्मचाऱ्यानं बायको अन् मुलासह घरातच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमुळे गूढ वाढलं

Retired Bank Officer and Family ends life at Home: जयपूरच्या करणी विहार परिसरात निवृत्त बँक अधिकाऱ्यानं कुटुंबासह आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचं कारण सुसाईड नोटमध्ये लिहिलं.
Retired Bank Officer and Family ends life at Home
Retired Bank Officer and Family ends life at HomeSaam
Published On
Summary
  • निवृत्त बँक अधिकाऱ्यानं कुटुंबासह आत्महत्या केली.

  • भाड्याच्या घरात आयुष्य संपवलं.

  • सुसाईड नोटमध्ये सासऱ्याचं नाव नमूद.

  • पोलिसांकडून नोटद्वारे तपास सुरू.

जयपूरच्या करणी विहार परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीये. निवृत्ती बँक कर्मचाऱ्यानं त्याच्या कुटुंबासोबत आयुष्य संपवलं. शनिवारी कुटुंबातील कोणतेही सदस्य दरवाजा उघडत नसल्यामुळे शेजारचे घाबरले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, सुसाईड नोट सापडली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

रूपेंद्र शर्मा, त्यांची पत्नी सुशीला आणि मुलगा पुलकित शर्मा असे मृत व्यक्तींची नावे आहेत. रूपेंद्र हे निवृत्ती बँक अधिकारी होते. ते आपल्या कुटुंबियांसोबत करणी विहार या परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, रूपेंद्र आणि त्याची पत्नी व मुलानं तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

Retired Bank Officer and Family ends life at Home
RSS सदस्यांकडून लैंगिक छळ अन् काठीनं मारहाण, इंजिनिअरनं लॉजवर उचललं टोकाचं पाऊल, १५ पानांवर संघावर आरोप

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये रूपेंद्र यांनी त्यांच्या सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांना शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Retired Bank Officer and Family ends life at Home
पहाटेच्या वेळी शिंदेंच्या घरात घुसले अन् कुटुंबाला मारहाण, चॉपर अन् कोयत्यानं प्राणघातक हल्ला, नेमकं प्रकरण काय?

घरमालक रामगोपाल शर्मा यांनी सांगितले की, 'रूपेंद्र गेल्या २ वर्षांपासून माझ्या घरात त्याच्या कुटुंबासोबत भाडेकरू म्हणून राहत होता. संपूर्ण कुटुंब खूप चांगले होते. कधीही कुणासोबत त्यांचे भांडण नव्हते. रूपेंद्र सकाळी ५ वाजता रोज पाणी आणण्यासाठी आणि घर स्वच्छ करण्यासाठी उठायचे. मात्र, आज ८ वाजले तरी, त्यांचे दार उघडले नाही. काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आहे. त्यामुळे शेजारी आणि पोलिसांना याची माहिती दिली. तसेच नातेवाईकांना कळवले', अशी माहिती घरमालकाने दिली. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसाकंडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com