नवऱ्याला सोडलं अन् हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध; गुप्तांग कापल्यानं प्रियकराने महिलेला संपवलं

Woman Strangled to Death by Lover in Hotel: हॉटेलमध्ये विवाहित महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. प्रियकरासोबत लग्नाच्या कारणावरून झालेल्या वादातून बॉयफ्रेंडने हत्या केल्याचा संशय.
Woman Strangled to Death by Lover in Hotel
Woman Strangled to Death by Lover in HotelSaam Tv
Published On

पंजाबच्या लुधियाना येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला विवाहित असून, तिच्या प्रियकराने तिची हत्या केली असल्याचं बोललं जात आहे. हत्येनंतर आरोपी पसार झाला. परंतु, पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. प्रियकरासोबत हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर महिलेचा गळा दाबून खून केला.

रेखा असे मृत महिलेचं नाव आहे. तर, अमित निषाद असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. महिलेला दोन मुलेही आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा आणि अमित बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तिने आपल्या पतीला सोडले होते. शुक्रवारी रेखा आपल्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेल इंडो- अमेरिकनमध्ये गेली होती. दोघांनी हॉटेलमध्ये खोली घेतली. तसेच तिथे त्यांनी काहीवेळ एकत्र घालवला.

Woman Strangled to Death by Lover in Hotel
धुरंधर फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, लग्नाआधीच कपलला आहेत २ मुलं

शारीरिक संबंधानंतर रेखाने अमितवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं. रेखाने अमितचा गुप्तांग कटरने कापला. यामुळे संतापलेल्या अमितने रेखाचा गळा दाबून खून केला. तसेच हॉटेलमधून पसार झाला. काहीवेळानंतर हॉटेल मॅनेजरला महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. हॉटेल मॅनेजरने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Woman Strangled to Death by Lover in Hotel
१२ तासांत १,०५७ पुरूषांसोबत शरीरसंबध, एडल्ट कंटेंट क्रिएटरचा दावा; कोण आहे ही महिला?

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अमितला ताब्यात घेतलं. त्याच्या गुप्तांगावर वार केल्यामुळे अमितवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com