

अभिनेता अर्जून रामपाल सध्या आपल्या धुरंधर या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाचा आनंद साजरा करीत आहे. या यशाच्या दरम्यान त्याने चाहत्यांसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रेम आणि नातेसंबंधांवर होत असलेल्या एका अनौपचारीक गप्पांमध्ये अर्जुनने मोठा खुलासा केला आहे. त्यानं गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्ससोबत अधिकृतपणे साखरपूडा केला असल्याचं जाहीर केलं.
हा खुलासा अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टच्या एका टीझरमधून समोर आला आहे. या टीझरमध्ये गॅब्रिएला म्हणते, 'आमचं लग्न अजून झालेलं नाहीये. पण कोण जाणे पुढे काहीही होऊ शकते'. यावर अर्जून मध्येच हसतो. तसेच म्हणतो, 'आमचा साखरपूडा झाला आहे. आणि ही गोष्ट मी सर्वात आधी तुमच्या शोमध्ये सांगत आहे'.
अर्जूनने केलेल्या या खुलाशामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१९ सालापासून अर्जून आणि गॅब्रिएला एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना आरिक आणि आरिव असे दोन मुले आहेत. या पॉडकास्टमध्ये दोघांनी साखरपूडा झाला असल्याचे जाहीर केले. त्यांनी यावेळी नात्यात आलेल्या बदलांबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
गॅब्रिएलाने सांगितले की, 'प्रेम अनेकदा अटींसह येतं. एखादी व्यक्ती ठराविक पद्धतीने वागली, तरच तिला प्रेम मिळते. पण जेव्हा तुमचं मूल असतं, तेव्हा असं करता येत नाही, नाही का?', असं ती म्हणाली. यानंतर गॅब्रिएला गंमतीने म्हटलं की, 'अर्जून खूप हॉट आहे', त्यावर अर्जून, 'नाही नाही, मी तिच्या मागे गेलो होतो. कारण ती खूप हॉट आहे. पण तिला जाणून घेतल्यानंतर, तिच्यात बरंच काही खास आहे, हे लक्षात आलं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.