खळबळजनक! धावत्या कारमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

rajasthan crime news : धावत्या कारममध्ये बारावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
crime news
rajasthan crime newsSaam tv
Published On
Summary

राजस्थानच्या बिकानेर घडली धक्कादायक घटना

धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार

तरुणीवरील अत्याचारानंतर गावात खळबळ

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात हादरवणारी घटना घडली आहेत. जिल्ह्यातील नापासर भागातील १२वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीसोबत ६ जानेवारी रोजी संपूर्ण घटना घडली. मात्र, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी सकाळच्या सुमारास घरातून कॉलेजला निघाली होती. या तरुणीचा दोघांनी रस्ता अडवला. त्यानंतर तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. तरुणीला कारमध्ये बसवल्यानंतर तिला वेगाने दुसऱ्याने ठिकाणी नेण्यास सुरुवात केली.धावत्या कारमध्येच तरुणीवर आरोपींनी अत्याचार करण्यास सुरुवात केली. आरोपी पीडित तरुणीला तासंतास कारमध्येच फिरवत राहिले.

आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची देखील धमकी दिली. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी एका गावात कार थांबवली. त्यानंतर गावकऱ्यांना त्यांच्यावर संशय आला. गावकऱ्यांनी तातडीने पीडित तरुणीची सुटका केली. यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

crime news
कोण होते IAS अनुराग तिवारी, वाढदिवसाच्या दिवशी रस्त्यावर सापडला होता मृतदेह; १००० कोटींच्या घोटाळ्याचा करत होते तपास

गावातील लोकांनी तातडीने तरुणीच्या नातेवाईकांना माहिती दिली. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला घरी नेलं. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपींवर गुन्हा नोंदवला. पीडित तरुणीचं वय अठराहून अधिक आहे.तर आरोपींच्या वयाविषयी कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

crime news
टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन तपासाला सुरूवात केली आहे. पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली आहे. परंतु पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. कॉलेजला जाणाऱ्या मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com