BJP Youth Leader’s Wife Dies Under Suspicious Circumstances
BJP Youth Leader’s Wife Dies Under Suspicious CircumstancesSaam

धक्कादायक! महागड्या चारचाकीसाठी बायकोची हत्या; भाजप नेत्यावर मुलीच्या वडिलांचा आरोप, अंत्यसंस्कारवेळी भयंकर घडलं

BJP Youth Leader’s Wife Dies Under Suspicious Circumstances: राजस्थानच्या भरतपूरमध्ये हुंड्यासाठी पत्नीची हत्या. भाजप नेत्यावर गंभीर आरोप. नेमकं प्रकरण काय?
Published on

राजस्थानमधील भरतपूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजप नेत्यावर हुंड्यासाठी बायकोचा खून केल्याचा आरोप आहे. मृत महिलेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी लेकीची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. पती आणि सासरची मंडळी लेकीकडे थार जीपची मागणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्रियांका असे मृत महिलेचं नाव आहे. ते सेवार पोलीस स्टेशन परिसरातील गणेश कॉलनीतील रहिवासी होती. प्रियांकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. तर, प्रियांकाचा पती आकाश हा भाजप युवा मोर्चाचा माजी जिल्हा सरचिटणीस असल्याची माहिती आहे. आकाश आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी प्रियांकाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

BJP Youth Leader’s Wife Dies Under Suspicious Circumstances
भाजपाला मोठा धक्का! बड्या नेत्याकडून ऐन निवडणुकीत रामराम, काँग्रेसच्या 'हाता'ला दिली साथ

मृत महिलेचे वडील ओमप्रकाश यांनी सांगितले की, २४ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची मुलगी प्रियांका हिचे लग्न आकाशशी मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नात सुमारे त्यांचा २० लाख रूपये खर्च झाला होता. लग्ना झाल्यानंतर प्रियांकाला हुंड्यासाठी छळ करण्यात आला. ओमप्रकाशच्या म्हणण्यानुसार, आकाश आणि त्याचे कुटुंब प्रियांकाला सतत थार जीपची मागणी करून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. कुटुंबाला प्रियांकाच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांना धक्का बसला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

BJP Youth Leader’s Wife Dies Under Suspicious Circumstances
दुर्दैवी! सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण, कोल्हापूरमध्ये भयानक अपघात, दोघांच्या डोक्याचा चेंदामेंदा

सेवार पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश चंद म्हणाले की, 'पोलिसांना एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली होती. तिचे सासरचे लोक मृतदेह अंत्यसंस्कारसाठी घेऊन जात होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली. घटनास्थळावरून पोलिसांनी पुरावे गोळा केले. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.' हुंड्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे प्रियांकाची हत्या करण्यात आली, असा आरोप महिलेच्या माहेरच्या लोकांनी केला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com