Shocking : आजीच्या घरी येऊन जातो म्हणून नेलं निर्जनस्थळी अन्...; सीनियरकडून ११वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Punjab Crime News : पंजाबच्या होशियारपूरमध्ये स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या तरुणाने ११वीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Punjab 16 years old student rape by senior student
Punjab 16 years old student rape by senior student Saam Tv
Published On
Summary
  • पंजाबच्या होशियारपूरमध्ये धक्कादायक घटना

  • तरुणाने ११वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला

  • आरोपीने व्हिडिओ चित्रीत करून पीडितेला धमकावल

  • पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पंजाबच्या होशियारपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ११वीच्या विद्यार्थिनीसोबत स्नॅपचॅटवर ओळख वाढवून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणाने शारीरिक संबंध ठेवताना व्हिडिओ चित्रित केला अन् तरुणीला व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित तरुणी ही इयत्ता ११वीच्या वर्गात शिकते. आरोपी आणि तरुणी एका अकॅडमीमध्ये शिकतं होते. आरोपी तरुणीपेक्षा सिनियर होता. तिची आणि आरोपीची ओळख स्नॅप चॅटवर झाली. स्नॅपचॅटवर ओळख वाढवल्यावर दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. याचं मैत्रीचा फायदा घेत तरुणाने तिला आपल्या आजीच्या घरी नेतो सांगत आपल्यासोबत घेऊन गेला. मात्र त्याने आजीच्या घरी न नेता पीडितेला भलत्याच ठिकाणी नेले आणि त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं.

Punjab 16 years old student rape by senior student
Monsoon Upate : मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट; पुढील ४ ते ५ दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून

घटनास्थळी पोचल्यावर तरुणाने पीडितेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले. याचं वेळेस त्याने तिला धमकावत शारीरिक संबंध ठेवताना व्हिडिओचे चित्रीकरण केले. या चित्रीकरणाचा फायदा घेत तरुणाने तिला घडलेला प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. तसेच उकळण्यात आले. या घटनेनंतर तरुणी घाबरली. तिने सुरुवातीला कुटुंबियांना घडलेला कोणताही प्रकार सांगितला नाही. परंतु आरोपीकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला.

Punjab 16 years old student rape by senior student
Shocking : मुंबईत बड्या राजकीय नेत्याचं बारमधील मुलीशी नको ते कृत्य, रिव्हॉल्व्हर दाखवून शरीराचे लचके तोडले

घडलेला प्रसंग ऐकताच कुटुंबियांच्या जमीन हादरली. पीडितेच्या आईने रविवारी पोलीस ठाण्यात जात संबंधित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com