मुंबईत धक्कादायक घटना
बार डान्सरवर भाजप नेत्याकडून लैंगिक शोषण
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आरोपी फरार
Bar Girl Rape By BJP Leader Suraj Deoda News मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका भाजप नेत्याने बारमधील तरुणीला लग्नाची स्वप्न दाखवत लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संबंधित भाजप नेते सूरज देवडा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही बार डान्सर असल्याचे समोर आले आहे. तिने दाखल केलेल्या तक्रारीनुसार,मुंबईतील दहिसर-बोरिवली भागातील भाजप मंडळाचे महामंत्री सूरज देवडा यांनी स्वतः विवाहित असतानाही आपण अविवाहित असल्याचे भासवत एका तरुणीशी ओळख वाढवली. पुढे तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन केला. तसेच एका नामांकित कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट (सीए) म्हणून नोकरी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवले असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने विविध कारणे सांगत पीडितेकडून तब्बल १५ लाख रुपये घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच एका बारमध्ये तिच्यावर ५० हजार रुपयांच्या नोटा उधळल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. शुद्धीवर आल्यानंतर अंगावरील कपडे नसल्याचे लक्षात आल्याचा दावा तिने केला आहे. याशिवाय, या घटनेचे आरोपीने देखील काढल्याचे गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
आरोपीने आपल्या दोन सहकाऱ्यांनाही पीडितेचा गैरफायदा घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने बंदूक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व घटनांमुळे ती घाबरली होती, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या निर्देशानंतर तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या विशेष पथक आरोपीचा शोध घेत असून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.