शेतकऱ्यांचा आधारवड हरपला! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन; राजकारणासह कृषिक्षेत्रात शोककळा

Senior BJP Leader Virendra Pandey Dies After Prolonged Illness: भाजपचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक आणि माजी पॅक्स अध्यक्ष वीरेंद्र पांडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शेतकरी हित आणि कृषी विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
SENIOR BJP LEADER VIRENDRA PANDEY PASSES AWAY
SENIOR BJP LEADER VIRENDRA PANDEY PASSES AWAYsaam tv
Published On: 

भाजपचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक आणि माजी अध्यक्ष वीरेंद्र पांडे यांचे मंगळवारी आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चनचौरा पंचायतसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वीरेंद्र पांडे हे उत्तरप्रदेशच्या रसलपूर चनचौरा पंचायतच्या बनपुरा गावचे मूळ रहिवासी होते. सामाजिक कार्यात ते कायम सक्रिय होते, तयांच्या मनमिळावू स्वभावासोबतच जनसेवेच्या कार्यामुळे ते परिसरात लोकप्रिय होते. गरीब आणि गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असत.

SENIOR BJP LEADER VIRENDRA PANDEY PASSES AWAY
Rahul Gandhi detained : राजधानी तापली! राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काँग्रेस कार्यकर्त्यांची घरपकड

पॅक्स अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना वीरेंद्र पांडे यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी तसेच कृषी विकासासाठी विविध उपक्रम राबवले. भाजपचे सक्रिय आणि समर्पित नेते म्हणून त्यांनी पक्ष संघटना तळागळात मजबूत करण्यासाठीही काम केले.

वीरेंद्र पांडे यांच्या निधनावर खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल यांनी शोक व्यक्त केला. वीरेंद्र पांडे हे भाजपचे मजबूत कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे सिग्रीवाल यांनी म्हटले.

SENIOR BJP LEADER VIRENDRA PANDEY PASSES AWAY
Sanjay Raut : संजय राऊत यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील मोर्चात आली भोवळ

वीरेंद्र पांडे यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर बनपुरा येथील त्यांच्या पैतृक निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी समर्थक, ग्रामस्थ आणि विविध नेत्यांची मोठी गर्दी झाली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे भरेपूर कुटुंब आहे.

SENIOR BJP LEADER VIRENDRA PANDEY PASSES AWAY
Breaking News : पोटनिवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा! मतदानानंतर उमेदवाराला केली अटक; नेमकं काय घडलं?

भाजप नेत्यांकडून श्रद्धांजली

भाजपचे नेते अविनाश चंद्र उपाध्याय, बंटी ओझा, चितरंजन सिंह, सुबोध सिंह, चैतेन्द्र नाथ सिंह, प्रकाश, सूर्यनंदन शाही, प्रमोद सिंह, विकास मिश्रा यांच्यासह अनेक नेत्यांनी वीरेंद्र पांडे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तसेच दिवंगत आत्म्यास शांती लाभावी, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com